श्री हावगीस्वामी महाविद्यालयात माणिकराव पाटील यांना भावपूर्ण श्रद्धांजली
उदगीर (प्रतिनिधी) : भारत लिबरल एज्युकेशन सोसायटीचे माजी उपाध्यक्ष व सन्माननीय ज्येष्ठ सदस्य श्री माणिकराव पाटील देवणीकर यांचे अल्पश: आजाराने नुकतेच निधन झाले. याबद्दल संस्था व महाविद्यालयाच्यावतीने त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. यावेळी अध्यक्षस्थानी संस्थेचे अध्यक्ष ॲड. गुणवंतराव पाटील हैबतपूरकर, उपाध्यक्ष शिवकुमार हसरगुंडे, सहसचिव प्रभूराज कप्पीकेरे, कोषाध्यक्ष शंकरप्पा हरकरे, संस्थेचे सदस्य गुरुनाथअप्पा हरकरे, गिरीश पाटील कौळखेडकर, वीरेंद्र स्वामी, रवींद्र हसरगुंडे,डॉ.दयानंद वैद्य आदी उपस्थित होते. याप्रसंगी उपाध्यक्ष शिवकुमार हसरगुंडे, प्र.प्राचार्य डॉ. एस.डी. लोहारे, उपप्राचार्य डॉ.आप्पाराव काळगापुरे, डॉ. दत्ताहरी होनराव,डॉ. सुशीलप्रकाश चिमोरे, प्रा. मनोहर भालके, आदींनी आपल्या भावना व्यक्त केल्या. माणिकराव पाटील यांचे व्यक्तिमत्त्व अतिशय संयमी असल्याच्या भावना आपल्या मनोगतातून सर्वांनी व्यक्त करून श्रद्धांजली अर्पण केली. समारोपात ॲड.गुणवंतराव पाटील हैबतपूरकर म्हणाले की, माणिकराव पाटील यांनी अगदी सुरुवातीपासून सर्वांना जोडण्याचे व मार्गदर्शन करण्याचे काम केले.त्यामुळे आपली संस्था अतिशय चांगल्या प्रकारे चालू आहे. अशी माणसं संस्थेत असणे काळाची गरज आहे असेही ते म्हणाले. यावेळी महाविद्यालयातील प्राध्यापक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.