गुडसूरकर यांच्या निवडीने सांस्कृतिक वैभवात भर – तहसीलदार रामेश्वर गोरे
उदगीर (प्रतिनिधी) : “समृद्ध सांस्कृतिक वारसा ही उदगीरची ओळख असून राज्य साहित्य संस्कृती मंडळावर धनंजय गुडसूरकर यांची निवड या वैभवात भर टाकणारी आहे” असे प्रतिपादन तहसीलदार रामेश्वर गोरे यांनी केले.राज्य साहित्य संस्कृती मंडळाच्या सदस्यपदी धनंजय गुडसूरकर यांची निवड झाल्याबद्दल कलादीप प्रतिष्ठानच्या वतीने आयोजित सत्कार सोहळ्यात ते बोलत होते.राष्ट्रपती पुरस्कार प्राप्त शिक्षक विश्वनाथ मुडपे अध्यक्षस्थानी होते. प्रशासकीय संधी असो वा सामाजिक क्षेत्रातील मिळणाऱ्या संधी कार्यासाठी प्रेरित करणाऱ्या असतात. या माध्यमातून होणारे कार्य हे ओळख असते, ही ओळखच पदाला न्याय देणारी असते. सांस्कृतिक वैभव असणाऱ्या उदगीरसाठी ही बाब गौरवास्पद असल्याचे तहसिलदार गोरे पुढे बोलताना म्हणाले. साहित्य व सांस्कृतिक चळवळीत धनंजय गुडसूरकर यांच्या निरलसपणे केलेल्या कार्याचा यावेळी गौरव करण्यात आला. संतोष आचारे, व्ही. एस. कुलकर्णी, विश्वनाथ मुडपे गुरुजी, रामभाऊ मोतिपवळे, विक्रम हलकीकर, सोमनाथ निरणे, सागर माळगे, ओमकार निरणे, विपीन उळागड्डे, गणेश उळागड्डे आदी उपस्थित होते. कलादीप चे संचालक सोमनाथ निरणे यांनी प्रास्तविक केले.विश्वनाथ मुडपे यांनी सुत्रसंचालन तर विक्रम हलकीकर यांनी आभार मानले.