हडोळती परिसरातील आशा स्वयंसेविका ताईनी केला आमदार बाबासाहेबजी पाटील यांचा सत्कार…

हडोळती परिसरातील आशा स्वयंसेविका ताईनी केला आमदार बाबासाहेबजी पाटील यांचा सत्कार...

महाविकास आघाडी सरकारने केल्या मागण्या मान्य..

हडोळती (गोविंद काळे) : अहमदपूर चाकुर विधानसभा मदारसंघातील आशा स्वयंसेविका यांनी काही दिवसांपूर्वी आपल्या मागण्यांचे निवेदन आमदार बाबासाहेबजी पाटील यांना दिले होते. आमदार यांनी लागलीच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व आरोग्य मंत्री राजेश टोपे यांना आशा स्वयंसेविका चे मागण्या मान्य करण्यासंदर्भात पत्र दिले.
मा.खा.शरदचंद्रजी पवारसाहेब यांनीही आशा स्वयंसेविकाचे मागण्या पूर्ण करण्याचे सांगितले होते.लागलीच महविकास आघाडी सरकारने मागण्या मान्य केल्या. आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी १ जुलै २०२१ पासून १०००/- रुपये निश्चित मानधन वाढ आणि ५००/- रुपये कोविड लसीकरण भत्ता अशी १५००/- रुपयांची वाढ व आशा स्वयंसेविका ना स्मार्ट फोन देण्याची घोषणा केली. म्हणून आज आशा स्वयंसेविकानीं आमदार बाबासाहेब पाटील यांचा शाल पुष्पगुच्छ देवून सत्कार केला.

यावेळी आशा स्वयंसेविका चे सुपरवायजर कौडगावे एस.जी., सांगुळे एम.एस, आशा स्वयंसेविका शितल कोकाटे, मंगल मोरे, सुनीता निलेवाड, पार्वती वाघ,कुंभार अहिल्या,ज्योती थळपते, दैवशाला कांबळे,मीना कांबळे, राज्यश्री हेंगणे,गेंदाबाई गिरी या स्वयंसेविका यांच्यासोबत राष्ट्रवादी महिला जिल्हाध्यक्षा मिनाक्षी ताई शिंगडे, राष्ट्रवादी युवक जिल्हा उपाध्यक्ष अरबाज पठाण, राष्ट्रवादी ता.उपाध्यक्ष बालाजी पवार हांगरगेकर,ता.कार्याध्यक्ष अनिल पाटील, माजी सैनिक बालाजी पवार हडोळतीकर,पिंटू भोगे,अमृत भोगे, यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे विविध नेते,पदाधिकारी,कार्यकर्ते आदि. मान्यवर उपस्थित होते.

About The Author