गुढी पाडवा मतदान वाढवा’ मतदार जनजागृतीसाठी तहसीलमध्ये उभारली गुढी
अहमदपूर (प्रतिनिधी) : अहमदपूर तहसील कार्यालयाच्या प्रांगणात मराठी नववर्षानिमित्य लोकसभा सार्वत्रिक निवडणूक २०२४ साठी सहाय्यक निर्णय निवडणूक अधिकारी मंजुषा लटपटे,तहसीलदार शिवाजी पालेपाड यांच्या हस्ते ‘गुढी पाढवा मतदान वाढवा’ हे ब्रिद घेऊन मतदान जनजागृतीसाठी गुढी उभारण्यात आली.
स्वीप जनजागृती मोहीम अंतर्गत गुढीपाडवा या सणाच्या निमित्ताने मतदान वाढवा,असे संबोधित चिन्हाचा वापर करून भव्य गुढी लोकसभा सार्वत्रिक निवडणूक २०२४ च्या अनुषंगाने अहमदपूर विधानसभा मतदारसंघात लोकसभेसाठी मतदानाची टक्केवारी वाढविण्यासाठी सदर कार्यक्रम घेण्यात आले.यावेळी नायब तहसीलदार मुनवर मुजावर, तुकाराम बनकर,अव्वल कारकुन दत्तात्रय मद्दे,दत्तात्रय निलावार,प्रविण कांबळे,ओम उस्तुरे,वहीद्दोदिन शेख ,धनाजी गुंडेवाड,शिपाई आयुब पठाण, इसामोद्दीन शेख,सिद्धार्थ कांबळे आदिंची उपस्थितीत होती.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी स्वीप मतदान जनजागृती अभियानाचे सदस्य राज्यपुरस्कार प्राप्त कलाध्यापक महादेव खळुरे,बसवेश्वर थोटे,मोहन तेलंगे,शिवकुमार गुळवे,नागनाथ स्वामी,पुरुषोलम काळे,प्रमोद हुडगे, धनंजय नाकाडे आदींनी कार्यक्रम यशस्वीतेसाठी विशेष परिश्रम घेतले.