स्त्रीरोग संघटनेच्या अध्यक्षपदी डॉ.सविता पदातुरे ; सचिवपदी डॉ.प्राजक्ता गुरूडे

0
स्त्रीरोग संघटनेच्या अध्यक्षपदी डॉ.सविता पदातुरे ; सचिवपदी डॉ.प्राजक्ता गुरूडे

उदगीर (एल.पी.उगीले)
उदगीर स्त्रीरोग संघटनेच्या अध्यक्षपदी डॉ.सविता पदातुरे यांची तर सचिव पदी प्रसिद्ध स्त्रीरोग तज्ञ डॉ.प्राजक्ता गुरूडे यांची निवड करण्यात आली आहे.
नूतन पदाधिकाऱ्यांचा पदग्रहण सोहळा उदयगिरी लाॅयन्स नेत्र रुग्णालय येथे पार पडला. उदगीर स्त्रीरोग संघटनेच्या नूतन पदाधिकाऱ्यांच्या पदग्रहण सोहळ्यानिमित्ताने आरोग्य परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. परिषदेस भारतीय स्त्री संघटना, भारतीय स्त्री लाॅप्रोस्कोपिक संघटना आणि मुंबई स्त्रीरोग संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते. यावेळी नूतन अध्यक्ष डाॅ.सविता पदातुरे, सचिव डॉ. प्राजक्ता गुरूडे व इतर पदाधिकारी यांना स्त्रीरोग संघटनेचे महाराष्ट्र कमिटीचे चेअरमन डॉ.मदन कांबळे, फॅमिली वेल्फेअर कमिटीचे चेअरमन डाॅ.रचना जाजू यांनी पदग्रहण सोहळ्याची शपथ दिली. यावेळी आय.एम.ए.चे अध्यक्ष डॉ.बाळासाहेब पाटील, आ.ए.पी.चे अध्यक्ष डॉ.जयंत वायगावकर, ए.म.सी.चे अध्यक्ष डॉ.संतोष पांचाळ उपस्थित होते. यावेळी उपाध्यक्षपदी डॉ.आरती वाडीकर, कोषाध्यक्षपदी डॉ.शैलेश येरोळकर, सहसचिवपदी सौ.डॉ.आत्तार , डाॅ. राजेश राठोड यांचीही नूतन पदग्रहण समारंभात सत्कार करण्यात आला. मावळत्या अध्यक्षा डॉ.स्वाती पाटील आणि सचिव डाॅ.प्रवीण मुंदडा यांनी मागील वर्षांच्या पावन सांगितला. तसेच कार्य अहवाल नुतन अध्यक्षा, सचिव यांच्याकडे हस्तांतरित केले. या कार्यक्रमाच्या प्रास्ताविकातून नूतन सचिव व माहेर मॅटरनिटी टेस्ट ट्यूब बेबी हॉस्पिटलच्या संचालिका, प्रसिद्ध स्त्रीरोगतज्ञ डॉ.प्राजक्ता गुरुडे यांनी वर्षभरात राबविण्यात येणाऱ्या विविध आरोग्यविषयक आणि सामाजिक उपक्रमाची माहिती दिली. पर्यावरणाचा असमतोल दूर करण्यासाठी गो ग्रीन चा नारा देऊन झाडांना पाणी देऊन, झाडे जगवा असा संदेश दिला. तसेच दरवर्षी बारामाही महिन्यात स्त्री विषयक सर्व रोग निदान शिबिरे, कॅन्सर विषयक जनजागृती, जाणीव जागृतीपर असे विविध उपक्रम त्यांनी भारतीय स्त्री संघटनेच्या वतीनेही बारमाही राबविण्याचे यावेळी आश्वासन दिले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ. प्रीती येरनाळे यांनी केले. तर डॉ. सुप्रिया जगताप यांनी आभार प्रदर्शन केले. यावेळी या आरोग्य परिषदेस उपस्थित असलेले डाॅ.कांबळे व डाॅ.जाजू यांनी या परिषदेत अत्यंत मौलिक असे मार्गदर्शन केले. याप्रसंगी ५० डॉक्टरांनी आपला उत्स्फूर्त सहभाग नोंदवला.

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *