शास्त्री प्राथमिक शाळेत प्रभू श्रीराम जन्मोत्सव मोठ्या उत्साहात साजरा.
उदगीर (एल.पी.उगीले)येथील भारतीय शिक्षण प्रसारक संस्था,अंबाजोगाई द्वारा संचलित लालबहादुर शास्त्री प्राथमिक विद्यालयात हिंदू धर्माचे श्रध्दास्थान प्रभू श्रीराम जन्मोत्सवा निमित्त कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
या कार्यक्रमासाठी अध्यक्ष म्हणून मुख्याध्यापक अंकुश मिरगुडे,प्रमुख वक्ते म्हणून माधव केंद्रे,विभाग प्रमुख सुधाकर पोलावार व ज्येष्ठ शिक्षिका सौ सविता बोंडगे उपस्थित होते. व्यासपीठावरील मान्यवर पाहुण्यांच्या हस्ते प्रतिमा पूजन व दिपप्रज्वलन करण्यात आले.
कार्यक्रमाचे प्रमुख वक्ते माधव केंद्रे यांनी हिंदू संस्कृती संपूर्ण जगात महान संस्कृती आहे.हिंदू धर्मातील सर्वच सणांमधून आपल्याला प्रेरणा व ऊर्जा मिळत असते.प्रभू श्रीरामचंद्र एक आदर्श राजा होते.एकवचनी होते.असे सांगितले.श्रीराम नवमीविषयी सविस्तर मार्गदर्शन केले.
अध्यक्षीय समारोपपर भाषणात मुख्याध्यापक अंकुश मिरगुडे यांनी प्रभू श्रीरामचंद्राचे चरित्र सर्वांसाठी प्रेरणादायी आहे.रामायणातून सर्वांनी प्रेरणा घेऊन त्याप्रमाणे स्वतः आचरण करावे व विद्यार्थ्यांवर चांगले संस्कार रुजविण्याचे आवाहन केले.सुत्रसंचलन सौ.दिपाली भावसार यांनी केले.