लालबहादूरच्या श्रेया कुलकर्णीला होमी भाभा बालवैज्ञानिक परिक्षेत रौप्य पदक.
उदगीर (एल.पी.उगीले) वैज्ञानिक क्षेत्रात शालांत पातळीवरील अतिशय प्रतिष्ठित समजली जाणारी डॉ. होमी भाभा बालवैज्ञानिक सायन्स टॅलेन्ट सर्च या परीक्षेत लालबहादूर शास्त्री माध्यमिक विद्यालयाची इयत्ता नववीची श्रेया सुनील कुलकर्णी या विद्यार्थिनीने चौथ्या राऊंडमध्ये घवघवीत यश संपादन करत बाल वैज्ञानिक म्हणून तिची नुकतीच निवड झाली. या यशाबद्दल तिला सिल्व्हर मेडल आणि मानपत्र देऊन नुकतेच गौरविण्यात आले आहे. श्रेया सुनील कुलकर्णी या विद्यार्थिनीच्या यशाबद्दल लालबहादूर शास्त्री विद्यालयात विशेष सत्कार करण्यात आला.
या कौतुक सोहळ्यासाठी जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था मुरुडचे प्रा.निशिकांत मिरकले, गट साधन केंद्र उदगीर येथील विषय तज्ञ डॉ. ज्ञानोबा मुंडे, मुख्याध्यापक अंबादासराव गायकवाड ,उपमुख्याध्यापक संजय कुलकर्णी, पर्यवेक्षक कृष्णा मारावार श्रीपाद समुखे, माधव मठवाले उपस्थित होते.
श्रेया कुलकर्णीला मार्गदर्शन करणारे होमी भाभा परीक्षेचे प्रमुख विज्ञान शिक्षिका रागिनी बर्दापूरकर ,संदीप बोधनकर ,विषय शिक्षक राहुल नेटके, राजेश्वर डोंगरे या मार्गदर्शक शिक्षकांचे यावेळी कौतुक करण्यात आले. या यशाबद्दल शालेय समितीचे अध्यक्ष मधुकर वट्टमवार ,कार्यवाह शंकरराव लासुणे, माध्यमिक शालेय समितीचे अध्यक्ष सतनप्पा हुरदळे, मुख्याध्यापक अंबादास गायकवाड, उपमुख्याध्यापक संजय कुलकर्णी,तसेच पर्यवेक्षक व सर्व शिक्षक , सर्व विद्यार्थ्यांनीनी अभिनंदन केले आहे. आणि पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.