प्रा.डॉ.बळीराम भुक्तरे यांच्या पुस्तकाचे प्रकाशन संपन्न
उदगीर (एल.पी.उगीले) : येथील महाराष्ट्र उदयगिरी महाविद्यालयातील हिंदी विभागप्रमुख डॉ. बळीराम भुक्तरे यांच्या ‘हिंदी साहित्य का परिचयात्मक इतिहास’ या पुस्तकाचे प्रकाशन प्रा.सुभाष भिंगे यांच्या हस्ते संपन्न झाले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.आर.के. मस्के हे होते. यावेळी व्यासपीठावर उपप्राचार्य डॉ.एस.जी.पाटील (व.म.), उपप्राचार्य प्रा.एस.जी.कोडचे (क.म.), पर्यवेक्षक प्रा.जे.आर.कांदे उपस्थित होते. तसेच त्यांना ‘आय. सी. एस. एस. आर.’ यांच्यातर्फे मान्यता मिळालेल्या बृहद संशोधन प्रकल्पासाठी त्यांचा सत्कार करण्यात आला. प्रा.भूक्तरे यांनी यापूर्वी यूजीसी चा बृहत संशोधन प्रकल्प पूर्ण केला आहे. त्याचबरोबर त्यांची यापूर्वी पाच पुस्तके प्रकाशित झाले आहेत. स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ अंतर्गत पीएच.डी. चे मार्गदर्शक म्हणून कार्य करत आहेत. विद्यापीठ आणि स्वायत्त महाविद्यालयाच्या अभ्यास मंडळावर सदस्य म्हणून ते कार्य करत आहेत. यापूर्वी त्यांनी राष्ट्रीय तसेच आंतरराष्ट्रीय परिषदा तसेच चर्चासत्रा मध्ये सहभाग नोंदवून आपल्या संशोधन लेखांच वाचन केले आहे. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्राध्यापक सचिव ग्रंथपाल प्रा. डॉ. लक्ष्मीकांत पेन्सलवार यांनी तर आभार प्रा. नागनाथ खांडेकर यांनी मानले.