संजय गांधी निराधार योजनेचा लाभ घेण्याचे समितीचे आवाहन

संजय गांधी निराधार योजनेचा लाभ घेण्याचे समितीचे आवाहन

देवणी (प्रतिनिधी) : संजय गांधी निराधार योजनेअंतर्गत येणाऱ्या विविध योजनांचा लाभ घेण्याचे आवाहन तालुका निराधार समितीचेअध्यक्ष वैजनाथ लुल्ले यांनी केले आहे. श्रावण बाळ राज्य सेवा योजना, इंदिरा गांधी राष्ट्रीय वृद्धपकाळ योजना, विधवा,अपंग,दुर्धर आजाराने ग्रस्त असलेले रूग्ण, परित्यक्ता, वेश्या व्यवसायातुन मुक्त झालेल्या महिला, दारिद्र्यरेषेखालील कुटुंब यांच्यासाठी शासनाने विविध प्रकारच्या योजना सुरु केल्या आहेत. या योजनेचा लाभ घेन्यासाठी अनेक लाभार्थी कोसो दुर आहेत. कार्यकर्त्यांनी असे लाभार्थी शोधून त्यांना लाभ मिळवून देण्यासाठी प्रयत्न करावे.योजनेचा लाभ घेण्यासाठी काही अडचणी येत असल्यास समितीच्या सदस्यांना भेटुन त्या अडचणी दुर करून घ्यावे. लाभार्थीचे अर्ज म्हणावे त्या प्रमाणात मंजुरीसाठी येत नसल्याचेही त्यांनी सांगितले. जास्तीतजास्त लाभार्थ्यांना लाभ मिळवुन देण्यासाठी प्रयत्न करीत असल्याचे समिती चे चेअरमन वैजनाथ लुल्ले यांनी बोलताना सांगितले.

About The Author