गेंड्याची कातडी पांघरून झोपेचे सोंग घेणारे देवणी तालुक्यातील प्रशासन आनंद जीवने यांच्या मरणाची वाट पाहत आहेत काय?
उपोषणाचा आठवा दिवस
तालुक्यातील बऱ्याच सामाजिक संघटनाचा उपोषणाला पाठिंबा
देवणी (प्रतिनिधी) : येथील राष्ट्रीय समाज पक्षाचे मराठवाडा संपर्क प्रमुख आनंद जीवने यांनी तालुक्यातील कृषी कार्यालय, पंचायत समिती, रजिस्ट्री कार्यालय नगर पंचायत सार्वजनिक बांधकाम कार्यालयात होत असलेल्या अनागोंदी कारभाराच्या विरोधात देवणी नगर पंचायत कार्यालया समोर गेली आठ दिवसापासून अमरण उपोषण चालू केले आहे गेंड्याची कातडी पांघरूण झोपेचे सोंग घेणाऱ्या या तालुक्यातील अधिकारी कर्मचारी यांना उपोषणाच्या आठव्या दिवशी ही जाग येते नाही तालुका दंडाधिकारी मा तहसीलदार यांच्या पत्राला संबंधित अधिकारी यांनी केराची टोपली दाखविली असल्याने नाविलाजास्तव तहसील कार्यालयावर संबधित अधिकारी यांना स्मरण पत्र काढण्याची वेळ तहसीलदार यांच्यावर आली आहे अश्या कामचुकार कर्मचारी अधिकारी यांच्यावर घटनात्मक कारवाई करण्याचे अधिकार नेमके कोणाला शासकीय कामाच्या बाबतीत टोलवा टोळवी करीत आहेत तालुका दंडाधिकारी यांचे नेमके अधिकार कोणते आता तहसील प्रशासनावर प्रश्न चिन्ह निर्माण होत आहेत आपल्या अधिकाराचा घटनात्मक वापर करून संबंधित दोषी अधिकारी यांच्यावर कारवाई करण्याची मागणी जोर धरत आहेत.
तालुक्यातील भ्रष्ट अधिकारी कर्मचारी यांना देवणी तालुक्यातील जनता वैतागली आहे देवणी तालुक्यात मुख्यलयी राहतो असे शासनाच्या डोळ्यात धूळफेक करून हजारो रुपये चे घरभाडे उचलत आहेत परंतु मुख्यलयी एकही कर्मचारी अधिकारी राहत नाही व कार्यालयातही वेळेत उपस्थित राहत नाहीत जर उपस्थित असतील तर संबंधित लाभार्थ्यांचे आर्थिक पिळवणूक केल्याशिवाय कोणतेच काम करीत नाहीत रस्त्याचे काम बऱ्याच दिवसापासून रखडले आहे रस्त्यावर अनेक अपघात होत आहेत याला कारणीभूत कोण असा प्रश्न उपस्थित झाला आहे रमाई अवास योजना प्रधानमंत्री अवास यांचे हप्ते बऱ्याच दिवसापासून पडले नसल्याने अनेकांचे संसार उघड्यावर पडले आहेत पावसात अनेकांची तारांबळ उडाली आहे कायमस्वरूपी मुख्याधिकारी नसल्याने कोणतेच कामे होत नाही. पंचायत समिती कार्यालयात तर टेबल टू टेबल लोकांची आर्थिक लूट केली जात आहे. त्यांची उच्च स्तरीय चौकशी करून यांच्यावर कार्यवाही केल्याशिवाय आपण उपोषण मागे घेणार नसल्याचे आनंद जीवने यांनी सांगितले.