महात्मा फुले महाविद्यालयाच्या परीक्षा केंद्रास दूर शिक्षणचे संचालक डॉ. विनायक जाधव यांची भेट

0
महात्मा फुले महाविद्यालयाच्या परीक्षा केंद्रास दूर शिक्षणचे संचालक डॉ. विनायक जाधव यांची भेट

महात्मा फुले महाविद्यालयाच्या परीक्षा केंद्रास दूर शिक्षणचे संचालक डॉ. विनायक जाधव यांची भेट

अहमदपूर (गोविंद काळे) : येथील महात्मा फुले महाविद्यालयात सुरू असलेल्या स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ नांदेडच्या दूरशिक्षण विभागाच्या एम.ए. व एम. कॉम. च्या परीक्षा केंद्रास स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाचे दूरशिक्षण विभागाचे संचालक प्राचार्य डॉ. विनायक जाधव यांनी सदिच्छा भेट देऊन समाधान व्यक्त केले.
याबाबतचे सविस्तर वृत्त असे की, स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाने महात्मा फुले महाविद्यालयाच्या ‘परीक्षा केंद्रास आदर्श परीक्षा केंद्र’ म्हणून यापूर्वी गौरीविले आहे. परीक्षा केंद्रप्रमुख तथा प्राचार्य डॉ.वसंत बिरादार पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू असलेल्या या परीक्षा केंद्रावर महात्मा फुले महाविद्यालय अहमदपूर, कर्मयोगी तुळशीराम पवार महाविद्यालय हडोळती , संजीवनी महाविद्यालय चापोली, स्वामी विवेकानंद महाविद्यालय शिरूर ताजबंद , महात्मा फुले महाविद्यालय किनगाव तसेच शिवलिंग शिवाचार्य महाराज अध्यापक महाविद्यालय अहमदपूर च्या दूरशिक्षण विभागाचे पदव्युत्तर एम. ए. व एम. कॉम. चे विद्यार्थी परीक्षा देत आहेत. या परीक्षा केद्रावरील सर्व सुविधांची पाहणी केली तसेच कॉपीमुक्त वातावरणात परीक्षा सुरू असल्याबद्दल संचालक प्राचार्य डॉ. विनायक जाधव यांनी समाधान व्यक्त केले.
तसेच आदर्श परीक्षा केंद्र म्हणून नावलौकिक मिळविलेल्या परीक्षा केंद्राचे केंद्रप्रमुख तथा प्राचार्य डॉ. वसंत बिरादार पाटील यांचे तसेच सहाय्यक परीक्षा केंद्रप्रमुख प्रो. डॉ. अभिजीत मोरे, सह परीक्षा केंद्रप्रमुख डॉ. नारायण जायभाये, दूरशिक्षण विभागाचे समन्वयक प्रो. डॉ . अनिल मुंढे, दूर शिक्षण विभागाचे सह समन्वयक डॉ. संतोष पाटील, उपप्राचार्य डॉ. डी. डी. चौधरी तसेच परीक्षा विभागामध्ये सहाय्य करणारे प्रो. डॉ. नागराज मुळे, डॉ. मारोती कसाब आदींचे कौतुक करून पुढील कार्यासाठी शुभेच्छा दिल्या.

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *