नरेंद्रजी मोदी यांना भक्कम साथ देण्यासाठी खा. सुधाकरराव श्रृगांरे यांना प्रंचड मताने विजयी करा – आमदार बाबासाहेब पाटील
अहमदपूर (गोविंद काळे) : देशाची सुरक्षा व देशाचा सर्वागीण विकासासाठी तिसऱ्यांदा पंतप्रधान पदी नरेंद्रजी मोदी राहणे काळजी गरज आहे. पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांना भक्कमपणे साथ देण्यासाठी लातूर लोकसभेचे महायुतीचे उमेदवार खा सुधाकरराव श्रृगांरे यांना प्रंचड मतांने विजयी करण्याचे अहवान आयोजित मेळाव्यात अहमदपूर,चाकुर विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान आमदार बाबासाहेब पाटील यांनी केले आहे.
निष्कलंक व निष्पाप असलेल्या खा. सुधाकरराव श्रृगांरे यांना मत म्हणजे नरेंद्रजी मोदी यांना मत असून देशाच्या व लातूर जिल्ह्याच्या सर्वागीण विकासासाठी महायुतीचे लोकप्रिय उमेदवार खा सुधाकरराव श्रृगांरे यांना मोठ्या मताधिक्याने विजयी करण्यासाठी महायुतील सर्वांनी एकजुटीने काम करुन सुधाकरराव श्रृगांरे यांना मोठ्या मताधिक्याने विजयी करण्याचे अहवान यावेळी राष्ट्रवादी काँगेस पक्षाचे नेते तथा अहमदपूर विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान आमदार बाबासाहेब पाटील यांनी केले आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या माध्यमातून महाराष्ट्रातील महायुतीच्या सरकारने रेल्वे सेवा,विमान सेवा, राष्ट्रीय महामार्ग,वहातूकीसाठी रस्त्याचे जाळे उभे करून राज्याचा सर्वागीण विकास केला आसून देशाची मान जगात उंचावली आहे.
लोकप्रिय खा. सुधाकरराव श्रृगांरे यांनी गेल्या पाच वर्षाच्या काळात हर घर नल योजनेसाठी कोट्यवधी रुपयांचा निधी खेचून आणून मतदारसंघात राष्ट्रीय महामार्गाचे जाळे उभे केले आहे. सुधाकरराव श्रृगांरे यांना विजय करा जनतेच्या कामासाठी आम्ही कटीबद्ध असल्याचेही यावेळी आमदार बाबासाहेब पाटील यांनी सांगितले.
अहमदपूर तालुक्यातील खंडाळी जिल्हा परिषद गटातील कार्यकर्त्याचा मेळावा सांगवी येथे घेण्यात आला.
यावेळी भारतीय जनता पक्षाचे जिल्हा अध्यक्ष दिलीपराव देशमुख, भारतीय जनता पक्षाचे प्रदेश प्रवक्ते गणेश दादा हाके पाटील, माजी आमदार बब्रुवान खंदाडे, भाजपाचे जिल्हा सरचिटणीस अॅड. भारत चामे, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस शिवानंद हेंगणे, ओबीसी मोर्चा च्या मराठवाडा अध्यक्षा सौ. महादेवी मठपती, कुलदीप हाके,डॉ.सिद्धार्थकुमार सुर्यवंशी यांची यावेळी मतदारासी मेळाव्यात संवाद साधला.
यावेळी परभणी जिल्हा भाजपाचे जिल्हा सरचिटणीस भागवत बाजगिर,ओबीसी मोर्चाचे प्रदेश सचिव ज्ञानोबा बडगिरे,रमेश श्रृगांरे,जिल्हा उपाध्यक्ष ओम पुणे, जिल्हा चिटणीस हणमंत देवकते, दत्तात्रेय जमालपुरे, बुथ विस्तारक चंदशेखर डांगे, नाथराव केंद्रे, महीला मोर्चाच्या तालुका अध्यक्षा जयश्री केंद्रे, जिल्हा उपाध्यक्षा पुष्पाताई तेलंग, युवा मोर्चाचे तालुका अध्यक्ष रामानंद मुंडे, भाजपाचे शहराध्यक्ष सुशांत गुणाले,रामनाथ पलमटे,दत्ता खंदाडे,माणिक नरवटे, संतोष कोटलवार,जिवण गायकवाड, सुभाष सोनकांबळे, परमेश्वर आढाव ,दयानंद वाघमारे, प्रफुल्ल ढवळे, सरपंच राजू कांबळे, बालाजी हेमनर,शिवाजी येरमे,रंगनाथ सुरनर, बाबाराव बारवाड,बंडूक्ष सुरणर, यांच्या सह खंडाळी जिल्हा परिषद सर्कल मधील मोठ्या प्रमाणात मतदार या मेळाव्याला उपस्थित होते.
मेळाव्याचे प्रास्ताविक भाजपाचे तालुका अध्यक्ष प्रताप पाटील यांनी केले तर मेळाव्याचे सुत्रसंचालन करून आभार भारतीय जनता पक्षाचे जिल्हा उपाध्यक्ष गोविंद गिरी यांनी मानले.