महायुतीचे उमेदवार खा. सुधाकरराव श्रृगांरे यांच्या प्रचारार्थ भाजपाचे प्रदेश प्रवक्ते गणेश दादा हाके पाटील यांच्या गावोगावी काॅर्नर बैठका

0
महायुतीचे उमेदवार खा. सुधाकरराव श्रृगांरे यांच्या प्रचारार्थ भाजपाचे प्रदेश प्रवक्ते गणेश दादा हाके पाटील यांच्या गावोगावी काॅर्नर बैठका

महायुतीचे उमेदवार खा. सुधाकरराव श्रृगांरे यांच्या प्रचारार्थ भाजपाचे प्रदेश प्रवक्ते गणेश दादा हाके पाटील यांच्या गावोगावी काॅर्नर बैठका

अहमदपूर (गोविंद काळे) : देशाच्या सर्वागीण विकास करण्यासाठी व देश सुरक्षित ठेवण्यासाठी तिसऱ्यांदा पंतप्रधान नरेंद्रजी मोदी राहणे ही काळजी नितांत गरज असून पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांना पंतप्रधान करण्यासाठी भारतीय जनता पक्षाचे व महायुतीचे उमेदवार खा. सुधाकरराव श्रृगांरे यांना मोठ्या मताधिक्याने विजयी करण्याचे आवाहन अहमदपूर तालुक्यातील अनेक गावात झालेल्या काॅर्नर बैठकीत भारतीय जनता पक्षाचे प्रदेश प्रवक्ते गणेश दादा हाके पाटील यांनी केले आहे.
अहमदपूर तालुक्यातील ब्रम्हवाडी, शिंदगी बु.,मांगदरी,दक्षीण रुई,हागदळ,गुगदळ,वरवटी,रुई तांडा, शिंदगी खु. येथे आज भारतीय जनता पक्षाचे प्रदेश प्रवक्ते तथा अहमदपूर विधानसभा प्रमुख गणेश दादा हाके पाटील यांनी मतदारांच्या गाठीभेटी घेऊन काॅर्नर बैठका घेतल्या.
लातूर लोकसभेचे भारतीय जनता पक्ष व महायुतीचे अधिकृत उमेदवार खा. सुधाकरराव श्रृंगारे यांच्या प्रचारार्थ तालुक्यातील अनेक गावात जाऊन जनतेची संवाद साधुन भारतीय जनता पक्ष व महायुतीच्या उमेदवाराला बहुमताने विजयी करण्याचे अहवान भाजपाचे प्रदेश प्रवक्ते गणेश दादा हाके पाटील यांनी केले आहे.
महायुतीचे उमेदवार सुधाकरराव श्रृगांरे यांना मत म्हणजे पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांना मत असल्याचे ही यावेळी गणेश दादा हाके पाटील यांनी प्रत्येक्ष मतदारांच्या भेटी घेऊन सांगितले.
यावेळी भाजपाचे जिल्हा चिटणीस हणमंत देवकते,कुलदीप हाके, प्रदेश सदस्य दत्तात्रय जमालपुरे, पंचायत समितीचे सदस्य माणिक नरवटे,संतोष कोटगिरे,प्रशांत मुळे,अंबादास केंद्रे,धोंडीबा देवकते,विजय केंद्रे,कृष्णा थावरे,किशन मुळे,तुळसिदास देवकते,विनायक थावरे,पिराजी देवकते,संतोष सुर्यवंशी,गोविंद पडले, प्रभु पाटील,उत्तम रोडे, बालाजी तोंडारे,गुंडेराव तोंडारे, मलकू रोडे, रमाकांत तोंडारे,बालाजी चव्हाण,के.के.राठोड,बाळुराठोड यांच्या सह प्रत्येक गावातील प्रतिष्ठीत नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *