अहमदपूर स्वीप कला पथकाने केली धाराशीव आकाशवाणी वरुन मतदार जनजागृती

0
अहमदपूर स्वीप कला पथकाने केली धाराशीव आकाशवाणी वरुन मतदार जनजागृती

अहमदपूर स्वीप कला पथकाने केली धाराशीव आकाशवाणी वरुन मतदार जनजागृती

लातूर (गोविंद काळे) : भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार लोकसभा सार्वत्रिक निवडणूक २०२४ मध्ये मतदारांमध्ये मतदानाची टक्केवारी वाढविण्यासाठी जनजागृती होत आहे,देशातील तिसऱ्या व राज्यातील दुसऱ्या टप्प्यात होणाऱ्या लोकसभा सार्वत्रिक निवडणूक २०२४ साठी लातूर-धाराशीव मतदारसंघात मतदानाचा टक्का वाढण्यासाठी अहमदपूर स्वीप कला पथकाने नव मतदार,सुजाण मतदार व दिव्यांग मतदार बंधू-भगिणीसाठी प्रबोधनपर लोकगीतांची रचना करुन प्रबोधपर लोकगीताच्या माध्यमातून ९० गावपातळीवर मतदार जनजागृती केली.याची दखल घेऊन या कार्यक्रमाचे प्रसारण राज्यातील मतदार श्रोत्यांसाठी आँल इंडिया रेडिओचे धाराशीव आकाशवाणी केंद्रावरुन दि.०५ मे रविवार रोजी सायंकाळी ७:३० वा.या वेळेत प्रसारीत होणार आहे.
अहमदपूर चाकूर विधानसभा मतदारसंघात स्वीप कलापथकाने नाविन्यपूर्ण उपक्रमातून सकाळी ७ ते सायंकाळी १० वाजेपर्यंत गावात जाऊन ५७ दिवसात ८० गावात जाऊन मतदारांना मतदानाचे महत्त्व पटवून देऊन जनजागृती केली.याचबरोबर
भारत निवडणूक आयोगाच्या प्राप्त सुचनेनुसार चुनावी पाठशाला,घोषवाक्य लेखन,चित्र रंगभरण स्पर्धा,रांगोळी स्पर्धा,पथनाट्यातून जनजागृती,निबंध स्पर्धा,मतदार प्रतिज्ञा,संकल्प पत्र,शाळा महाविद्यालय जनजागृती,मतदार जनजागृती रँली,दिव्यांग जनजागृती,स्वाक्षरी मोहिम,गाथा दिंडी,पारायण,भजनी मंडळ,अखंड शिवनाम,हरीनाम सप्ताहात जनजागृती,सेल्फी पाँईंट,गुडी पाडवा,मतदान वाढवा,प्रबोधनपर भारुड,गोंधळ,पोवाडा,लावणी,जोगवा या लोकगीतातून जनजागृती,प्रवचन,किर्तन,राष्ट्रीय महामार्गावरील टोल नाका,शासकीय ग्रामीण रुग्णालय,पोलिस कार्यालय,बसस्थानक,एस. टी.वर्कशाँप,धाराशीव आकाशवाणी केंद्र,वस्त्र भांडार,सराफ आसोशिएशन अशा १०१ नाविन्यपूर्ण उपक्रमातून जनजागृती करण्यात आले.स्वीप पथक प्रमुख महादेव खळुरे,शिवकुमार गुळवे, बसवेश्वर थोटे,मोहन तेलंगे,नागनाथ स्वामी
सौ.अर्चना माने,पुरुषोत्तम काळे प्रमोद हुडगे,धनंजय नाकाडे आदिंनी विशेष परिश्रम घेतले.
वरील यशाबद्दल निवडणूक सामान्य निरिक्षक निरंजन कुमार जिल्हाधिकारी तथानिवडणूक निर्णय अधिकारी वर्षा घुगे-ठाकूर,धाराशीवचे जिल्हाधिकारी डाँ सचिन ओम्बासे,सहाय्यक जिल्हाधिकारी नमन गोयल,पोलिस अधिक्षक सोमय मुंढे,जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अनमोल सागर,उपजिल्हाधिकारी मंजुषा लटपटे,तहसीलदार शिवाजी पालेपाड,नरसिंग जाधव, शिक्षणाधिकारी नागेश मापारी,गटशिक्षणाधिकारी बबनराव ढोकाडे आदिनी यशस्वीपणे उपक्रम राबविल्याबद्दल व आकाशवाणीवरुन मतदान जनजागृती केल्याबद्दल अभिनंदन व कौतुक केले.

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *