देश हितासाठी नरेंद्रजी मोदींना साथ देऊन लातूरच्या स्वाभिमानासाठी सुधाकरराव श्रृगांरे यांना विजयी करा – कृषी मंत्री धनंजय मुंडे
अहमदपूर (गोविंद काळे) : देशाची सुरक्षा व देशाचा सर्वागीण विकासासाठी, देशाच्या अभिमानासाठी तिसऱ्यांदा पंतप्रधान पदी राहण्यासाठी नरेंद्रजी मोदींना साथ देऊन लातूर जिल्ह्याचा स्वाभिमानासाठी कर्तबगार असलेल्या सुधाकरराव श्रृगांरे यांना बहुमताने विजयी करण्याचे अहवान महाराष्ट्र राज्याचे कृषी मंत्री धनंजय मुंडे यांनी आयोजित प्रचार सभेत केले.
लातूर लोकसभेचे भारतीय जनता पक्ष महायुतीचे उमेदवार खा.सुधाकरराव श्रृगांरे यांच्या प्रचारार्थ अहमदपूर शहरातील मेन रोडवरील डॉ बाबासाहेब आंबेडकर चौकात सभेचे आयोजन करण्यात आले होते.
पुढे बोलताना कृषी मंत्री धनंजय मुंडे म्हणाले की ही निवडणूक देशाची असल्याने जाती धर्माचा विचार न करता देश हिताचा विचार करून येणाऱ्या निवडणूकीत महायुतीचे उमेदवार खा सुधाकरराव श्रृगांरे यांना बहुमताने विजयी करून आपला खासदार मोदींच्या बाजूने उभा करावा.
नरेंद्र मोदींनी पंतप्रधान पदाची सुत्र हाती घेतल्यापासून आजपर्यंत एकही आतंकवाद्यांचा हल्ला आपल्या देशावर झाला नाही.140 कोटी जनता हे कुटुंब समजून देशसेवा करणारे पंतप्रधान नरेंद्र मोदी आसुन चंद्र सूर्य असेपर्यंत देशाची राज्य घटना कोणीही बदलू शकत नाही त्यामुळे काँग्रेस व महा विकास आघाडीच्या अपप्रचाराला बळी पडू नका , माझ्या इज्जतीची, प्रतिष्ठेची ही निवडणूक असल्याने असेही खासदार सुधाकरराव श्रृगांरे यांना मोठ्या मताधिक्याने निवडून देण्याचे अहवान शेवटी करून आचारसंहिता संपल्याबरोबर शेतकऱ्यांच्या सोयबीनला भरघोस पॅकेज देऊन पिकविम्याचा प्रश्न मार्गी लावणार असल्याचे आश्वासन यावेळी कृषी मंत्री धनंजय मुंडे यांनी दिले.
यावेळी व्यासपीठावर राष्ट्रवादी काँगेस पक्षाचे नेते तथा अहमदपूर विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान आमदार बाबासाहेब पाटील, महायुतीचे उमेदवार खा सुधाकरराव श्रृगांरे,
भारतीय जनता पक्षाचे जिल्हा अध्यक्ष दिलीपराव देशमुख, भारतीय जनता पक्षाचे प्रदेश प्रवक्ते गणेश दादा हाके पाटील, माजी आमदार बब्रुवान खंदाडे,माजी आमदार गोविंद केंद्रे, भाजपाचे जिल्हा सरचिटणीस अॅड. भारत चामे,माजी सभापती अशोक काका केंद्रे, माजी जिल्हा परिषद सदस्य त्रबंक आबा गुट्टे,माजी सभापती अयोध्याताई केंद्रे,नगराध्यक्षा अश्विनी कासनाळे, प्रदेश प्रवक्ते शिवानंद हैबतपुरे, ओबीसी मोर्चा चे प्रदेश सचिव ज्ञानोबा बडगिरे,राजकुमार मजगे,राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस शिवानंद हेंगणे, ओबीसी मोर्चा च्या मराठवाडा अध्यक्षा सौ. महादेवी मठपती, जिल्हा उपाध्यक्ष ओम पुणे,डॉ.सिद्धार्थकुमार सुर्यवंशी ,धनराज गुट्टे,गंगाधर अक्कानवरू,तालुका अध्यक्ष प्रताप पाटील,,माजी जिल्हा परिषद सदस्य सुदर्शन मुंडे,निवृती कांबळे, निखिल कासनाळे,माणीक नरवटे,प्रदेश सदस्य दत्तात्रय जमालपुरे, युवा मोर्चा चे तालुका अध्यक्ष रामानंद मुंडे,विष्णू तिकटे,सुभाष सोनकांबळे, बुथ विस्तारक चंदशेखर डांगे, महीला मोर्चाच्या तालुका अध्यक्षा जयश्री केंद्रे, जिल्हा उपाध्यक्षा पुष्पाताई तेलंग, भाजपाचे शहराध्यक्ष सुशांत गुणाले,रामनाथ पलमटे,दत्ता खंदाडे,रामनाथ पलमटे,बालाजी गुट्टे, संतोष कोटलवार,जिवण गायकवाड, परमेश्वर आढाव ,दयानंद वाघमारे, प्रफुल्ल ढवळे, यांच्या सह या मेळाव्याला हजारो जनसमुदाय उपस्थित होता. मेळाव्याचे सुत्रसंचालन करून आभार भारतीय जनता पक्षाचे जिल्हा उपाध्यक्ष गोविंद गिरी यांनी मानले.