मधुमेह व रक्तदाब तपासणी शिबिराचे अवलकोंडा येथे नियोजन
उदगीर (एल.पी.उगीले) तालुक्यातील मौजे आवलकोंडा येथील तात्काळ हनुमान मंदिर व मधुर डायबिटीज सुपर स्पेशालिटी सेंटर यांच्या संयुक्त विद्यमानाने मोफत आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. दरवर्षीप्रमाणे याही वर्षी गावामध्ये अखंड हरिनाम सप्ताहाचे नियोजन करण्यात आले होते.यावेळी एकूण 106 जणांची मधुमेहाची व रक्तदाबाची तपासणी करण्यात आली. तसेच वेगवेगळ्या आजारावर मार्गदर्शन करण्यात आले. मधुर डायबिटीज सेंटरचे डॉ.प्रशांत नवटक्के यांनी मधुमेह व रक्तदाब कसे नियंत्रणात ठेवायचे ? यावर मार्गदर्शन केले.यावेळी गणेश देवकत्ते, ज्ञानेश्वर सोमवाड ,प्रवीण बिरादार ,अजय बोधले ,संजय सोळुंके ,रेड्डी यांनी मदत केली. तसेच मधुमेहाची व रक्तदाबाची तपासणी रामेश्वर फुलारी, बालाजी कुमठे, अंकिता राठोड यांनी केली. मधुर डायबिटीज सेंटरचे तज्ञ डॉक्टर प्रशांत नवटके यांनी आज पर्यंत लातूर जिल्ह्यामध्ये अनेक ठिकाणी मोफत आरोग्य शिबिरे घेऊन हजारो रुग्णांवर उपचार केला आहे.