काँग्रेसचे तालुकाध्यक्ष कल्याण पाटील आणि सभापती हुडे यांचा दिलीपराव देशमुख यांच्या हस्ते सत्कार

0
काँग्रेसचे तालुकाध्यक्ष कल्याण पाटील आणि सभापती हुडे यांचा दिलीपराव देशमुख यांच्या हस्ते सत्कार

उदगीर (एल.पी.उगिले)
नुकत्याच पार पडलेल्या लातूर लोकसभा मतदारसंघाच्या निवडणूक प्रक्रियेमध्ये काँग्रेस पक्ष आणि महाविकास आघाडीतील घटक पक्ष या सर्वांना एकत्र ठेवून, निवडणुकीची धुरा अत्यंत समर्थपणे, सुयोग्य नियोजन करून राबवली. याबद्दल माजी सहकार मंत्री, काँग्रेसचे नेते दिलीपराव देशमुख यांनी काँग्रेस महाविकास आघाडीच्या सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते यांच्या उपस्थितीत प्रातिनिधिक स्वरूपात उदगीर तालुका काँग्रेसचे अध्यक्ष कल्याणराव पाटील आणि बाजार समितीचे सभापती शिवाजीराव हुडे यांचा शाल, श्रीफळ,पुष्पगुच्छ देऊन सत्कार करून कौतुक केले.
सत्तेच्या विरोधामध्ये अत्यंत ताकतीने आणि उत्कृष्ट नियोजन करून काँग्रेसची समाजवादी आणि सर्व धर्म समभाव ही विचारधारा ग्रामीण भागातील तळागाळातील जनतेपर्यंत पसरवण्याचे काम काँग्रेस पक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे ,शेतकरी कामगार पक्ष ,राष्ट्रीय दलित अधिकार मंच या सर्व घटक पक्षातील पदाधिकारी, कार्यकर्ते यांना सोबत घेऊन उत्कृष्ट कार्य केले. याबद्दल काँग्रेस पक्षाच्या वतीने सर्वांचे कौतुकही करण्यात आले.
तसेच भविष्यात येणाऱ्या सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये देखील याच पद्धतीने सर्वांनी एकोपा कायम ठेवून कार्य करावे, असेही आवाहन सहकार महर्षी दिलीपराव देशमुख यांनी केले.
याप्रसंगी उदगीर तालुका काँग्रेसचे अध्यक्ष कल्याण पाटील, उदगीर कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती शिवाजीराव हुडे, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्रजी पवार गटाचे प्रदेश सरचिटणीस प्रा.डॉ. शिवाजीराव मुळे, उदगीरच्या माजी नगराध्यक्षा तथा काँग्रेस पक्षाच्या प्रदेश सचिव सौ. उषा कांबळे, उदगीर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या उपसभापती प्रीती चंद्रशेखर भोसले, कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक विधीज्ञ पद्माकर उगिले, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे तालुकाप्रमुख चंद्रकांत टेंगेटोल, उदगीर शहर काँग्रेसचे अध्यक्ष मंजूर खा पठाण, बाजार समितीचे संचालक संतोष बिरादार, पंचायत समितीचे माजी उपसभापती ज्ञानोबा गोडभरले, पंचायत समितीचे माजी सदस्य धनबा लोहारकर, उदगीर येथील सुप्रसिद्ध दंत रोग तज्ञ डॉ. गोविंदराव सोनकांबळे, नव्यानेच काँग्रेस पक्षात प्रवेश केलेले श्रीकांत पाटील, राष्ट्रीय दलित अधिकार मंचचे प्रदेशाध्यक्ष निवृत्तीराव सांगवे यांच्या उत्कृष्ट कार्याचा अहवाल मांजरा सहकारी साखर कारखान्याचे व्हाईस चेअरमन रवींद्र काळे यांनी पक्षश्रेष्ठींना दिला.
उदगीर विधानसभा मतदारसंघांमध्ये काँग्रेस महाविकास आघाडीची एक उत्कृष्ट अशी फळी निर्माण झाल्याचे समाधानही सहकार क्षेत्रातील काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते आबासाहेब पाटील शेलुकर यांनी व्यक्त केले आहे.

सत्काराला उत्तर देताना कल्याणराव पाटील यांनी स्पष्ट केले की, पक्षश्रेष्ठींनी आपल्याला जो कार्यक्रम दिला, तो कार्यक्रम प्रामाणिकपणे सर्व कार्यकर्त्यांचा मान सन्मान जपत आपण करत आलो आहोत, आणि भविष्यातही करत राहनार. महाविकास आघाडीच्या सर्वच नेत्यांनी मोठा विश्वास टाकून काँग्रेस पक्षाच्या नेत्या प्रियंका गांधी यांची सभा उदगीर सारख्या तालुक्याच्या ठिकाणी दिली, आणि त्याचे नियोजन करण्याची संधी आम्हा कार्यकर्त्यांना दिली. आ.अमित देशमुख, आ. धीरज देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही काम केले. जनतेमध्ये महाविकास आघाडी बद्दल विश्वास निर्माण झाल्याने उदगीर येथे प्रियांका गांधी यांची सभा ऐतिहासिक अशीच झाली. भविष्यात देखील पक्षश्रेष्ठींनी दिलेली जबाबदारी आपण निष्ठेने पार पाडू. असेही याप्रसंगी नमूद केले.
याप्रसंगी कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती शिवाजीराव हुडे यांनी देखील पक्षाने आपल्यावर दिलेली जबाबदारी आपण सर्व ताकतीनिशी पार पाडली आहे, आणि जनमानसातून मिळणारा प्रतिसाद निश्चितच समाधानकारक असल्याचेही त्यांनी सांगितले. आभार प्रदर्शन काँग्रेस पक्षाचे युवा नेते नाना ढगे यांनी केले.

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *