उमेद अभियाना अंतर्गत शिरूर ताजबंद येथे राज हॉटेलचा शुभारंभ

उमेद अभियाना अंतर्गत शिरूर ताजबंद येथे राज हॉटेलचा शुभारंभ

अहमदपूर ( गोविंद काळे ) : महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानांतर्गत (उमेद) श्रमिक स्वयं सहायता समूहातिल महिला रेखा वैभव जाधव यांनी लाँकडाउन काळात अत्यंत माफक दरात आजारी रुग्णांना आहार ,चहा, नाश्ता ईत्यादी सकस आहार पुरवण्याचे काम केले याची दखल घेऊन तालुका अभियान व्यवस्थापन कक्षाकडून त्यांना समुदाय गुंतवणूक निधी पुरवण्यात आला व त्यांनी त्यातून हॉटेलचा शुभारंभ केला या कार्यक्रमाच्या शुभारंभ प्रसंगी प्रमुख मार्गदर्शक म्हणून शैलेश राख (तालुका अभियान व्यवस्थापक ) अहमदपूर श्नवनाथ देगनुरे BM-IBCB श्री.विशाल गुणावत प्रभाग समन्वयक शिरूर ताजबंद तसेच प्रभागातील सिआरपी उषा वाघमारे व कमल वाघमारे उपस्थित होत्या.

About The Author