श्रीकांत रामगिरवार यांची एस बी आय बँकेच्या प्रोबसनरी ऑफिसर पदी नियुक्ती

श्रीकांत रामगिरवार यांची एस बी आय बँकेच्या प्रोबसनरी ऑफिसर पदी नियुक्ती

अहमदपूर (गोविंद काळे) : बालाघाट तंत्रनिकेतन महाविद्यालय मध्ये इलेक्ट्रिकल विभागाचे विभाग प्रमुख म्हणून ज्यांनी काम पाहिले ते आमच्या महाविद्यालयाचे प्रा. श्रीकांत रामगिरवार रा अहमदपूर यांचे नुकतेच एसबीआय बँकेमध्ये प्रोबसनरी ऑफिसर म्हणून नाशिक जिल्ह्यात सलेक्शन झाल्यामुळे त्यांचा संस्थेच्यावतीने महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर नितीन शिवपुजे यांच्या हस्ते शाल, श्रीफळ व पुष्पहार देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी उपप्राचार्य स्वप्निल नागरगोजे, प्रा मदन आरदवाड , प्रा कालिदास पिटाळे प्रा, तोहीद शेख, प्रा संग्राम कोपणार, प्रा गणेश यमगिर, प्रा महेश स्वामी, प्रा भिसे, प्रा येर्गीकर, श्री सिद्धू मासोळे, श्री कुलकर्णी विजय, श्री पांचाळ विजय, श्री केंद्रे सतीश आदींनी अभिनंदन केले.

About The Author

error: Content is protected !!