भारतीय संविधानाचा शालेय व महाविद्यालयीन अभ्यासक्रमात समावेश करावा

भारतीय संविधानाचा शालेय व महाविद्यालयीन अभ्यासक्रमात समावेश करावा

केंद्रीय मंत्री संजय धोत्रे यांच्याकडे मागणी

अहमदपूर ( गोविंद काळे ) :
देशभरातील शालेय व महाविद्यालयीन अभ्यासक्रमात भारतीय संविधानाचा अनिवार्य विषय म्हणून समावेश करावा अशी आग्रही मागणी युवकनेते डॉ.सिध्दार्थकुमार सूर्यवंशी यांनी एका निवेदनाद्वारे केंद्रीय मानव संसाधन विकासमंत्री ना.संजय धोत्रे यांच्या कडे एका निवेदनाद्वारे केली आहे.

माजी आमदार बब्रूवानजी खंदाडे यांच्या नेतृत्वाखालील एका शिष्टमंडळाने नूकतीच दिल्ली येथे मानव संसाधन विकास मंत्री ना.संजय धोत्रे यांची भेट घेतली या प्रसंगी त्यांना या मागणीचे निवेदन देण्यात आले.

या निवेदनात पूढे म्हटले आहे की,प्रत्येक भारतीय नागरीकांना आपल्या संविधानाची सविस्तर माहिती ही असलीच पाहिजे. घटनाकार डाॅ.बाबासाहेब आंबेडकर यांनी देशभरातील प्रत्येक नागरिकाला डोळ्या पूढे ठेवून विविध भाषा, जात, पंथ,धर्म,संस्कृती असताना सूध्दा सर्वांना भारतीयत्वाच्या एका धाग्यात गुंफून ठेवले आहे. येथील नागरिकाच्या न्याय, हक्काचे संरक्षण तथा अधिकार बहाल केले आहेत. त्याच बरोबर कर्तव्यसूध्दा नमूद केले आहेत.एकूणच जगभरातील लोकशाहीतील एक आदर्श संविधान भारताचे असल्याचे वारंवार सिध्द झाले आहे. एक आदर्श व सजग भारतीय नागरिकाला या सर्व बाबींची अगदी विद्यार्थी दशेपासूनच माहिती असने गरजेचे आहे. त्यासाठी केंद्र सरकारने पुढाकार घेवून देशभरातील विविध शालेय बोर्ड, महाविद्यालयीन व विद्यापीठीय शिक्षणात ‘भारतीय संविधान’ हा विषय अनिवार्य म्हणून ठेवावा अशी मागणी केली.

या निवेदनाच्या अनुषंगाने ना.संजय धोत्रे यांनी विभागाच्या वतीने तातडीने कार्यवाही करण्याचे अश्वासन शिष्टमंडळाला दिले. या शिष्टमंडळात चाकूर शहराध्यक्ष प्रशांत बिबराळे, शिवशंकराप्पा काळगे, रवी पाटील आदींचा समावेश होता.

About The Author