हनुमान मंदिर परिसरातील बेकायदेशीर अतिक्रमण काढा अनाधिकृत मटन खानावळ मांस विक्री बंद करा !
विश्व हिंदू परिषद- बजरंग दल व हिंदू जागरण मंचची मागणी
अहमदपूर ( गोविंद काळे ) : येथील ग्रामदैवत हनुमान मंदिर परिसरामध्ये नगरपरिषदेच्या फार मोठ्या जागेत जुने भाजी मार्केट असुन येथे पान टपऱ्या व बेकायदेशीरपणे चालू असलेले अतिक्रमण उठवणे व अनाधिकृत मटण खानावळ, मटन मांस विक्री त्वरीत बंद करणे व शहरात इतरत्र रस्त्यावर, बस स्थानकाच्या समोर, शिवाजी चौकातील भाजी विक्री बंद करुन जुन्या भाजी मंडई च जागेत घेऊन जाण्याच्या मागणीसाठी चे निवेदन येथील तहसीलदार व कर्तव्यदक्ष मुख्याधिकारी यांना देण्यात आले आहे.
येथील आझाद चौक, मेन रोड, महात्मा गांधी कॉलेज रोड, छत्रपती शिवाजी महाराज चौक व बसस्थानक परिसरातील भाजी व फळ विक्रेत्यांना नगरपरिषदेचे भाजी मार्केट असतानाही आपला जीव धोक्यात घालून चक रस्त्यावर बसून विक्री करावी लागत आहे. नगर परिषदेच्या भाजी मार्केटमध्ये असलेले बेकायदेशीर अतिक्रमण उठविल्यानंतर तेथे शेतकरी व इतर भाजी विक्रेते एकाच ठिकाणी बसू शकतात. तेथे मटन खानावळ मटन मार्केट असल्याने मंदिराची विटंबना होत आहे. व रस्त्यावर फळे, भाजी विक्रेत्यांमुळे वाहतूक ची कोंडी, व रस्त्याने जाणा-यांमध्ये वाद होत आहेत. कायदा व सुव्यवस्था बिघडण्याची शक्यता आहे.. मेन रोड वरील दुकानदारांना लाखो रुपये भाडे भरूनही फळ विक्रेत्यांचा त्रास सहन करावा लागत आहे.
या बाबतीत अनेकदा निवेदने, आत्मदहनाचा इशारा देवूनही प्रशासनाकडून केवळ तोंडाला पाने पुसण्याची कामे झाली आहेत. तरी त्वरित अतिक्रमणे हाटवून भाजी मार्केट रिकामे करून रस्त्यावरील भाजी व फळ विक्रेत्यांना न्याय द्यावा व जनतेचा त्रास दुर करावा. अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा देण्यात आला.
यासाठी आज दि.29 जुन 2021 रोजी उपविभागीय अधिकारी, तहसीलदार, मुख्याधिकारी नगर परिषद, पोलीस निरीक्षक अहमदपूर यांना निवेदन देण्यात आले. यावेळी विश्व हिंदू परिषद ,बजरंग दल प्रखंड मंत्री मधुकर धडे, हिंदू जागरण मंचाचे विभाग प्रमुख अॅड. स्वप्नील व्हत्ते, सूर्यकांत (पापा) पाटील, गौरक्षा ता.प्रमुख प्रवीण हामणे, रवि कच्छवे, नरेश यादव, अक्षय मामडगे, रमेश ढाकणे, अक्षय स्वामी व कार्यकर्ते उपस्थित होते.