पोखरा योजने अंतर्गत उजना येथे कृषी दिन व पेरणीपूर्व शेती शाळा संपन्न
अहमदपूर (गोविंद काळे) : कृषी विभाग महाराष्ट्र शासन नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प पोखरा अंतर्गत सोयाबीन + तूर या पिकावर शेतीशाळा घेण्यात आली सदर शेतीशाळा मध्ये माहिती सांगताना शेतीशाळा प्रशिक्षक शरद हुडे यांनी पेरणीपूर्व शेती शाळेची माहिती सांगताना 75 ते 100 mm पाऊस पडल्यानंतर शेतकर्यांनी पेरणी करावी. जमिनी नुसार योग्य वाणांची निवड करावी, ऊगवण क्षमता चाचणी तपासूनच बियाणे पेरणीसाठी वापरावे. BBF यंत्राद्वारे पेरणी करावी यामुळे बियाण्यात बचत होते खताची बचत होते व पीक उत्पादनामध्ये वाढ होते पाऊस कमी झाल्यास किंवा पावसाचा खंड पडल्यास पीक तग धरू शकते. किडी व रोगाचे प्रमाण कमी होते. यासाठी bbf ने पेरणी करावी , ऊगवण क्षमता चाचणी तपासूनच पेरणी करावी व तसेच प्रात्यक्षिक दाखवत तसेच बीज प्रक्रिया कशा पद्धतीने करावी याबद्दल ही प्रात्यक्षिकाद्वारे माहिती देण्यात आली. प्रयोगशील शेतकरी बालाजी कासले यांच्या शेतात BBF वर सोयाबीन पेरणी करण्यात आली. महिला बचत गटांना ही मार्गदर्शन करण्यात आले. सीआरपी सत्यकला लहु बारवाड,मालुताई रेनगुंडे, अनिता बसमपुरी इत्यादी शेतकरी व महिला उपस्थित होते.