पंचायत समितीचे सभापती बालाजी मुंडे यांच्या हस्ते संगम येथे विशेष लसीकरण मोहिमेचा शुभारंभ ; 300 नागरिकांचे लसीकरण
परळी वैजनाथ (गोविंद काळे) : पालकमंत्री ना.धनंजय मुंडे व न.प.गटनेते वाल्मिक कराड यांच्या मार्गदर्शनाखाली संगम येथे शुक्रवार, दि.जुलै रोजी लसिकरण मोहिम राबविण्यात आली असुन उर्वरीत ग्रामस्थांना लवकरच पुढील टप्प्यात लस उपलब्ध करुन देण्यात येईल असे आश्वासन पं.स.सभापती बालाजी उर्फ मुंडे यांनी दिले. संगम येथील जिल्हा परिषद शाळेत ग्रामस्थांना कोविशिल्ड च्या पहिल्या व दुसर्या डोस साठी लसिकरण केंद्र राबविण्यात आले यावेळी 300 ग्रामस्थांना डोस देण्यात आला. तसेच आज लस न मिळू शकलेल्या गावातील नागरिकांचे लवकरच दुसऱ्या टप्प्यात लसीकरण केले जाणार आहे. या लसिकरण मोहिमेचा शुभारंभ पंचायत समिती सभातपी बालाजी ऊर्फ पिंटु मुंडे यांच्या हस्ते करण्यात आला.यावेळी सौ.वत्सलाबाई कोकाटे,उपसरपंच हनुमंत कामाळे, गंगाधर नागरगोजे, नागनाथ कराड, हरनावळ नाना , हरी गिराम, युनुस बेग, हरी नागरगोजे, बाळू गिराम, सर्व ग्रामपंचायत सदस्य,आरोग्य कर्मचारी डॉ.मकर, व आरोग्य कर्मचारी व जिल्हा परिषद शिक्षक यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते. यावेळी आपल्या गावात लसीकरण कार्यक्रमाचे आयोजन केल्या बदल सामाजिक न्याय विशेष साहाय्य मंञी तथा बीड जिल्हयाचे पालकमंञी ना.धनंजय मुंडे, गटनेते वाल्मिक आण्णा कराड, सभापती बालाजी मुंडे यांचे ग्रामस्थांनी आभार व्यक्त केले.