कोविड योद्धा परिचारिकेच्या मुलीच्या जन्माचे स्वागत
उदगीर ( प्रतिनिधी ) : येथील रजनी तोंडारे या परिचारिकेने गरोदर असताना ही कोविड योद्धा म्हणून ११ महिने कोविड सेटंर मध्ये काम केले. तिने परवा सुंदर अशा मुलीला जन्म दिला, म्हणून तिच्या मुलीला इनरव्हील क्लबतर्फे बेबी किट ,ड्रेस आणि शाल देऊन स्वागत करण्यात आले .
क्लबच्या अध्यक्षा तसेच प्रोजेक्ट प्रमुख मीरा चंबूले यांनी बाळाचे भरभरून कौतुक केले. त्यावेळी तिथे कलबच्या अध्यक्षा मीरा चंबूले, उपाध्यक्ष स्वाती गुरुडे, कोषाध्यक्ष मानसी चन्नावार, सहसचिव निलिमा पारसेवार तसेच प्रा. आश्विनी देशमुख या उपस्थित होत्या.