इंनरव्हील क्लब उदगीर यांचा स्तुत्य उपक्रम कोरोना योध्दा सन्मान आणि रूग्णांना पौष्टिक आहाराचे वाटप
उदगीर ( प्रतिनिधी ) : येथील सामाजिक उपक्रमात अग्रगणी असणार्या इनरव्हिल क्लब यांनी डाॅक्टर्स डे निमित्त सरकारी दवाखान्यात कोरोनो योध्दाच्या सत्काराचा कार्यक्रम आयोजित केला.या कार्यक्रमासाठी डाॅ. डि.व्ही पवार, डाॅ एस.एस.देशपांडे ,डाॅ. ए.बी.महेंद्रकर डाॅ.सौ आर.ए.कदम इंनरव्हील क्लब उदगीर अध्यक्ष सौ मीरा चंबूले, सचिव सौ. शिल्पा भंडे यांची मंचावर उपस्थिती होती.
या कार्यक्रमात मंचावरील मान्यवरां सह डॉ. मेघशाम कुलकर्णी, डॉ,सत्तारी, डॉ अजय सोनटक्के, डॉ. ज्योती वावदणे, डॉ. महेश अद्राळे, डॉ. अश्रुबा जाधव, डॉ. संदीप मुसने, डॉ. मनोहर सुर्यवंशी, डॉ. विजय बिरादार डॉ. प्रदीप सानप, डॉ. शशीकांत डांगे, डॉ. स्मिता वांजे, डॉ. किरण पाटील, डॉ. महेश वाघमारे, डॉ. जोत्सना डावरे
यांना कोरोना योध्दा म्हणून सन्मानित
करण्यात आले. वृक्ष संवर्धनाच्या हेतूने सन्मानचिन्ह सोबत गुलाबाचे रोप देण्यात आले. याच बरोबर इतर कर्मचारी वर्गांचा ही सत्कार करण्यात आला.या कार्यक्रमासाठी त्यांचे बहुमोल सहकार्य लाभले.
या वेळी इनरव्हिल मेंबर्सनी सर्व वैद्यकीय अधिकारी आणि आरोग्य कर्मचारी यांच्या सन्मानार्थ प्रतिज्ञा घेतली.
सरकारी रुग्णालयातील रुग्णांना पौष्टिक आहाराचे वाटप करण्यात आले.धन्वंतरी आयुर्वेदिक महाविद्यालयाचे प्राचार्य डाॅ.दत्ता पाटील आणि त्यांचे सहकारी यांचा ही सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. सौ अश्विनी संजय देशमुख यांनी केले तर आभार प्रदर्शन उपाध्यक्ष सौ. स्वाती गुरुडे यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी सहसचिव सौ. निलीमा पारसेवार , कोषाध्यक्ष सौ. मानसी चन्नावार, इनरव्हील क्लब सर्व मेम्बर डाॅ. सौ. सविता पदातुरे,सौ. अनुराधा मुक्कावार, सौ. अपेक्षा शेटकार ,सौ. अर्चना मुसने ,सौ. जयश्री गुरमे,सौ. सुप्रिया महाजन, यांनी परिश्रम घेतले.
इंनरव्हीलच्या या उपक्रमाचे उदगीर मध्ये सर्वत्र कौतुक होत आहे.