नागतिर्थवाडी येथे लसीकरण मोहिम
देवणी (प्रतिनिधी ) : मौजे नागतिर्थवाडी ता. देवणी जि. लातूर येथे आरोग्य विभागा मार्फत गाव तेथे लसीकरण या मोहिमे अंतर्गत लसीकरणाचे आयोजन करण्यात आले, या कार्यक्रमाची सुरुवात देवणी तालुक्याचे कर्तव्यदक्ष तहसीलदार सुरेशजी घोळवे यांच्या हस्ते पहिल्या लस घेणाऱ्या नरशिंग गिरी या व्यक्तीला पुष्पगुच्छ देऊन करण्यात आली. प्रथम सर्व आरोग्य कर्मचाऱ्यांचे स्वागत करण्यात आले , कृषी दिनानिमित्त गावातील शेतकऱ्याचा सम्मान म्हणून गावातील प्रगतशील शेतकरी तुळशीराम गुणाले व चंद्रप्रकाश गुणाले यांचा सत्कार करून तहसीलदार यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले, अंगणवाडी शिक्षिका यांना आरोग्य किट देण्यात आले.
तसेच तहसीलदारानी शाळेत झालेल्या बालाउपक्रम, मियावाकी , सौभाग्यवतीवती झाड , शाळेतील काम सुरू असलेले सार्वजनिक शौचालयाची पाहणी केली.
या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून रामलिंग भैय्या शेरे होते.
हे लसीकरण पूर्ण करण्यासाठी वैद्यकिय अधिकारी डॉ.हत्ते यांच्या मार्गदर्शना खाली सुमुदाय आरोग्य अधिकारी डॉ.नरहारे, आरोग्य सेविका व्हि. जी. सूरवसे,आशा सुपरवायझर आम्रपाली मॅडम, आरोग्य सेविका प्रियंका पोतदार , आरोग्य सेवक धुरे ,आशा कार्यकर्त्या भूमिका कासले, मदतनीस पुष्पा कांबळे, जि. प. मु.अ. गुंजरगे , शिक्षका गुंगे मॅडम यांनी मदत केली.
गावातील 81 लोकांनी या लसीकरणाचा लाभ घेतला.
या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी राज गुणाले , उपसरपंच विष्णुदास गुणाले, ग्रामसेवक श्रीकांत पताळे , नामदेव कासले, ग्रा.प. कर्मचारी शिवाजी उंचे यांनी परिश्रम घेतले.