शिक्षकाचे लोकशिक्षक असणे गौरवास्पद – जि.प.अध्यक्ष राहुल केंद्रे

शिक्षकाचे लोकशिक्षक असणे गौरवास्पद - जि.प.अध्यक्ष राहुल केंद्रे

 उदगीर (वार्ताहर ) : सामाजिक जडणघडणीत शिक्षकाची भूमिका ही महत्त्वाची असून शिक्षकाचे लोकशिक्षक होणे गौरवास्पद आहे. असे प्रतिपादन जिल्हा परिषदेचे अध्यक्ष राहुल केंद्रे यांनी केले.चांदेगाव येथील जि.प.शाळेचे मुख्याध्यापक उत्तमराव भुरे यांच्या  सेवानिवृत्तीनिमित्त आयोजित गौरव सोहळ्यात ते बोलत होते.प्रमुख पाहुणे म्हणुन प्रा.डॉ .गौरव जेवळीकर,  डॉ .रवी पाटील,प्रा.पंडीत सुर्यवंशी,उदयसिंह ठाकूर,बबन मुदाळे ,सागर बिरादार, अॕड.भाऊसाहेब जांभळे,बापूसाहेब कज्जेवाड,दिनकर केंद्रे,केंद्रप्रमुख  शिवशंकर पाटील,मु.अ.बालाजी बरूरे आदी उपस्थित होते.

           प्रारंभी हरितक्रांतीचे प्रणेते व माजी मुख्यमंत्री कै.वसंतराव नाईक यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले.सरपंच सुधाकर मुसने यांनी प्रास्तविक केले. “विद्यार्थ्यांच्या जिवनाला आकार देण्यात शिक्षकाचा सहभाग महत्त्वाचा असतो,शिक्षकाची भूमिका विद्यार्थ्यांचे जिवन घडविण्यात अत्यंत निर्णायक असते, सेवानिवृत्तीनिमित्त होणारा गौरव हा भुरे गुरुजींनी सेवाकाळात केलेल्या निष्ठावान सेवेचा सन्मान असल्याचे मत अध्यक्ष राहुल केंद्रे म्हणाले. यावेळी बोलताना प्रा.डॉ.गौरव जेवळीकर यांनी   प्रेमाने व निष्ठेने केलेले कार्य कायम संस्मरणीय असून  याचे सार्वत्रिकीकरण  होण्याची गरज प्रतिपादन केली.  अध्यक्षीय समारोपातून  शिक्षक हे कायम वंदनीय असल्याचे सांगून निष्ठेने कार्य करणारे शिक्षक समाजासाठी कायम वंदनीय असल्याचे सांगितले. यावेळी जि.प.केंद्रांतर्गत शाळांच्या वतीने उत्तमराव भुरे व सो.सुनिता भुरे यांचा मानपत्र व भेटवस्तु देऊन सत्कार करण्यात आला.  अंगणवाडी कर्मचारी सौ .शांताबाई तोगरगे यांचाही सेवानिवृत्तीनिमित्त सत्कार करण्यात आला.यावेळी मोहन गिरी, एस.एन.बिरादार,दामाजी बालूरे,जनार्दन जाधव,विवेक होळसंबरे,अभय बिरादार,जाकीर तांबोळी,दिनकर केंद्रे ,प्रा.पंडीत सुर्यवंशी यांची भाषणे झाली.  धनंजय गुडसूरकर यांनी सुत्रसंचालन तर शिवशंकर पाटील यांनी आभार मानले. संतोष स्वामी,भगवान पाटील,संजय मोघेकर,निळकंठ पाटील,रुपा बासरकर यांनी यासाठी पुढाकार घेतला.

About The Author