आमदार बाबासाहेब पाटील यांनी घेतली सुनेगाव (शेंद्री) येथील जायभाये कुंटुंबीयांची भेट

आमदार बाबासाहेब पाटील यांनी घेतली सुनेगाव (शेंद्री) येथील जायभाये कुंटुंबीयांची भेट

अहमदपूर (गोविंद काळे) : आज अहमदपूर-चाकुर मतदार संघाचे आमदार बाबासाहेब पाटील यांनी काल सुनेगाव(शेंद्री) येथे एकाच कुटुंबातील तिन चिमुकल्यांचा मन्याड नदीच्या पात्रात बुडून दुर्देवी मृत्यु झाला होता त्या मृत झालेल्या एका चिमुकल्याचे वडील तुकाराम जायभाये यांची अहमदपूर येथील स्वरांजली हॉस्पीटल येथे भेट घेऊन धिर दिला व दुसऱ्या दोन चिमुकल्यांचे वडील झानोबा जायभाये आजोबा विश्वनाथ जायभाये यांची सुनेगाव येथे भेट घेऊन स्वात्वन करून कुटुंबातील सर्वांना धिर दिला व प्रशासनाकडून सर्वोपरी मदत करण्याचे आश्वासन दिले यावेळी कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती शिवानंद हेंगणे जिल्हा परिषद सदस्य माधव जाधव, आमदार साहेबांचे स्वीय सहाय्यक धनंजय जाधव सरपंच सौ. उषा गोपीनाथ जायभाये, गोपीनाथ जायभाये, डॉ.रूपेश थगनगर, श्रीकांत केंद्रे , सुधाकर जायभाये, ज्ञानोबा जायभाये, राम जायभाये, गोविंद जायभाये, माधव काटे, माजी सरपंच नामदेव जायभाये, यादव काटे, कृष्णा काटे, शैलेश थगनर, विठ्ठल थगनर, शिवदास थगनर, पत्रकार गोविंद काळे आदींची उपस्थिती होती.

About The Author

error: Content is protected !!