तिन लहान चिमुकल्यांचा नदी पात्रात बुडून मृत्यु

तिन लहान चिमुकल्यांचा नदी पात्रात बुडून मृत्यु

एक मुलगी व दोन मुलांचा दुर्देवी अंत

अहमदपूर : तालुक्यातील सुनेगाव (शेंद्री) येथील ज्ञानोबा विश्वनाथ जायभाये, तुकाराम विश्वनाथ जायभाये या दोन सख्या भावांच्या तीन मुलांचा एक मुलगी दोन मुले नदीच्या कडेला शेळ्या चारायला गेले असता मन्याड नदी पात्रातील पाण्यात ओंडक्याच्या साह्याने पोहत असताना बुडून दुर्देवी मृत्यु झाल्याची घटना घडली आहे.
याविषयी सविस्तर माहीती अशी की तालुक्यातील सुनेगाव शेंद्री येथील शेतकरी विश्वनाथ मारोती जायभाये यांना दोन मुले आहेत एक मोठा मुलगा ज्ञानोबा विश्वनाथ जायभाये व दुसरा मुलगा तुकाराम विश्वनाथ जायभाये असुन मोठया मुलाला दोन मुली व एक मुलगा आहे तर लहान मुलाला एक मुलगा एक मुलगी आहे ते आज दुपारी अंदाजे ११ : ३० ते १२:०० वाजता आपल्या घरातील शेळ्या चारायला मोठया मुलाची मोठी मुलगी रोहिणी जायेभाये वय १४ वर्ष व लहान मुलगा प्रतिक जायभाये वय ९ वर्ष तसेच लहान मुलाचा मोठा मुलगा गणेश जायभाये वय १२ वर्ष आपल्याच मन्याड नदी काठी असलेल्या शेतात घेऊन गेले होते शेळ्या चारत असताना मन्याड नदी पात्रात पोहण्याचा मोह आवरला नाही व ओंडक्याच्या साह्याने पात्रातील आपल्याच शेताखालील डोहात पाण्यात पोहत असताना बुडून जागीच दुर्देवाने मृत्यु झाला असुन किनगाव पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरिक्षक शैलेश बंकवाड, पोलीस उपनिरिक्षक गजानन अन्सापुरे, पोहेकॉ मुरलीधर मुरकुटे, चंदु गोखरे, पोना महाके व्यंकट, सुग्रीव देवळे आदींनी धटनास्थळी तात्काळ धाव घेऊन पाण्यात बुडलेल्या मुलांचे शव गोता खोरांच्या साह्याने बाहेर काढले अहमदपूरचे उपविभागीय अधिकारी प्रमोद कुदळे व तहसीलदार प्रसाद कुलकर्णी यांनी घटनास्थळी भेट दिली सदरील तिन्ही मृतदेहाचे शवविच्छेदन करून मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आले असुन किनगाव पोलीस स्टेशन येथे आकस्मात मृत्युची नोंद करण्यात आली आहे त्यांचा अंतिम संस्कार सुनेगाव (शेंद्री) येथील त्यांच्या शेतात एकाच चितेवर संध्याकाळी ८:३० वाजता करण्यात आला सदरील दुःखद घटनेमुळे अहमदपूर तालुक्यात हळहळ व्यक्त आहे पुढील तपास सहाय्यक पोलीस निरिक्षक शैलेश बंकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरिक्षक गजानन अन्सापुरे, पोहेकॉ चंदु गोखरे हे करीत आहेत.

About The Author