औराद कृषी उत्पन्न बाजार समितीच्या नूतन संचालकांचा सावळा गोंधळ

औराद कृषी उत्पन्न बाजार समितीच्या नूतन संचालकांचा सावळा गोंधळ

निलंबित कर्मचाऱ्याच्या नावे सहा लाखाचा काढला धनादेश तर ग्रामपंचायत हद्दीतील रस्त्यावर चार लाखाचे टाकले खडक

चौकट : शिवसेनेच्या संचालकाने व जिल्हा नियोजन समितीच्या सदस्यांनी केली चौकशीची मागणी.

चौकट : मागील इ स.2016 ते 2017 वर्षाचा सुद्धा जवळपास दहा ते पंधरा लाखाचा अफरातफर आहे.

औराद शहाजानी (भगवान जाधव) : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीवर असलेले अशासकीय संचालक मंडळ मनमानी कारभार करत लाखो रुपयांची उधळण केली असल्याच्या तक्रारी जिल्हा उपनिबंधक यांच्याकडे केल्यामुळे उपनिबंधकांनी दिले चौकशीचे आदेश याची सविस्तर माहीती अशी की, मागील महीन्यात जिल्हा उपनिबंधक यांनी येथील कृषी उत्पन्न बाजार समितीवर अशासकीय संचालक मंडळाची निवड केली त्यात काँग्रेस पक्षाचे तीन व राष्ट्रवादी पक्षाचे दोन व शिवसेना पक्षाचे दोन अश्या सात संचालकांची निवड केली व त्यांना तेथील पदभार घेण्यासाठी सुचना पत्रही दिल्यानुसार सचिव राजेंद्र तांभाळे यांनी सर्व संचालक यांना कृषी उत्पन्न बाजार समिती कार्यालयात बोलावुन घेऊन त्यांचे सत्कार करुन एक बैठक घेतली व काँग्रेसचे रीयाजोद्दीन (हाजी) सराफ यांना व सचिव यांना अर्थिक व्यवहार करण्यासाठी परवानगी दिली.
१३ मे रोजी बाजार समितीचा पदभार स्वीकारून हाजीद्दीन सराफ यांना सहीचे अधिकार दिले. त्यानंतर २१ मे रोजी दुसरी बैठक घेतली व सुचना रजिस्टर न काढता बैठक अजेंडा पटलावर न ठेवता पाच सदस्यांनी नियमबाह्यरित्या उपनिबंधक लातूर यांची परवानगी नसताना व एक भ्रष्टाचाराच्या आरोपातील गुन्हा दाखल झालेला कर्मचारी कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये रुजु नसताना त्याला सहा लाख रुपये देण्यात आले व ग्रामपंचायत हद्दीत असलेल्या बाजार समिती आवारातील रस्त्यावर खडक टाकण्यासाठी जवळपास चार लाख रुपये खर्च केल्याचे संचालक बस्वराज वलांडे यांनी सांगितले व वेगवेगळ्या तारखेत केवळ सात दिवसामध्ये १४ ते १५ लाख रूपये खर्च केली असल्याचेही सांगितले.
असून सदर रक्कमेचा ताळमेळ लागत नाही तसेच ५० हजारापेक्षा जास्त रक्कम काढायची असेल तर उपनिबंधकाची परवानगी लागते परंतु कोणतीही परवानगी न घेता तत्कालीन सचिव राजेंद्र तांबाळे व हाजी सराफ यांच्या स्वाक्षीरीने ही रक्कम काढली असून बाजार समितीतील अंतर्गत मुलभूत सुविधा करण्यासाठी तात्पुरते स्वरूपात हाजीद्दीन सराफ यांना देण्यात आले. माञ या बैठकीत पाच संचालक उपस्थित असले तरी चार सदस्यांनी ही रक्कम काढण्यात यावी म्हणून सदर ठरवाला मंजूरी दिली आहे.त्यामध्ये लक्ष्मण कांबळे गंगाधर चव्हाण श्रीनिवास सुर्यवंशी यांचा समावेश आहे. हा प्रकार लक्षात येताच अशासकीय संचालक बस्वराज वलांडे यांनी व जिल्हा नियोजन क्षसमितीचे सदस्य लिंबन महाराज रेशमे यांनी या सर्व जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था लातूर यांच्याकडे लेखी तक्रार केली असून संपूर्ण प्रकरणाची सखोल चौकशी करावी अशी मागणी केली आहे. त्यावर जिल्हा उपनिबंधक लातूर यांनी सहाय्यक निबंधक निलंगा यांना या प्रकरणाची तात्काळ चौकशी करून स्वंयस्पष्ट अहवाल सादर करावा असा आदेश दिल्याने एकच खळबळ उडाली आहे.
याबाबत बस्वराज वलांडे यांनी ५० हजारापेक्षा जास्त रक्कम परवानगी नसताना नेमके कोणत्या धरतीवर ही रक्कम अदा केली असा सवाल केला असून संबंधित सर्व संचालक व सचिव यांची चौकशी समिती मार्फत चौकशी करुन कायदेशीर कार्यवाही करण्यासाठी तक्रार देऊन अशी मागणी केली आहे.
बाजार समितीच्या आर्थिक उन्नतीसाठी तात्पुरत्या स्वरूपात अशासकीय मंडळ म्हणून नियुक्त केले असले तरी या संचालक मंडळाकडून समितीचे हित जोपासण्यासाठी रक्षक म्हणून कार्य करण्यापेक्षा भक्षक झाल्याची चर्चा जास्त रंगत आहे.

About The Author