3 कोटी 50 लक्ष रुपयांच्या रस्त्याच्या कामाचे उदघाटन
अहमदपूर (गोविंद काळे) : चाकूर विधानसभा मतदारसंघातील शिरूर ताजबंद ते उदगीर रस्त्यावरील 3 कोटी 50 लक्ष रुपयांच्या सिमेंट रस्ता व डांबरी रस्त्याच्या कामाचे उदघाटन केले. यामध्ये 200 मीटर सिमेंट काँक्रीट व 1200 मीटर डांबरी रस्त्या व अन्य सोयी सुविधांची निर्मिती केली जाणार आहे. तसेच लवकरात लवकर आणि उच्च दर्जाच्या रस्त्याची निर्मिती करण्याच्या सूचना अधिकाऱ्यांना केल्या. यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सुभाष पाटील, जि.प.लातूर गटनेते मंचकराव पाटील, जि.प. सदस्य माधवराव जाधव, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे जिल्हा उपाध्यक्ष शिवानंद हेंगने, महेश अर्बन बँकचे उपाध्यक्ष निवृत्तीराव कांबळे, अहमदपूर तालुकाध्यक्ष शिवाजीराव देशमुख, चाकूर तालुकाध्यक्ष शिवाजीराव काळे, बी.आर. अंदे, शिवाजीराव खांडेकर, उप अभियंता मोरे, अभियंता सगर, चेअरमन दिलीप वलसे, व्हाईस चेअरमन गोविंद कापसे, रामप्रसाद जाधव, कोंडीबा पडोळे, माधवराव पाटील, रमाकांत भातीकिरे, विजयकुमार येलमटे, बाळू साखरे, बाळासाहेब बेडदे, अनिलजी वाडकर, गंगाधर ताडमे, दयानंद पाटील, अशोक सोनकांबळे, आशिष तोगरे, बालाजी दमकोंडवार, सादिक शेख, ईश्वर भूतडा, अनिल लामतुरे व शिरूर ताजबंद येथील गावाकऱ्यांची उपस्थिती होती.