केंद्र सरकारच्या इंधन दरवाढीच्या विरोधात लातुरात राष्ट्रवादीचे आंदोलन…

केंद्र सरकारच्या इंधन दरवाढीच्या विरोधात लातुरात राष्ट्रवादीचे आंदोलन...

राष्ट्रवादी चे जिल्हाध्यक्ष तथा आमदार बाबासाहेबजी पाटील साहेब यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी आक्रमक…
कोरोना कालावधीत आंदोलनाला चांगला प्रतिसाद..
अहमदपूर (गोविंद काळे) : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली भाजपा सरकारच्या निष्क्रियतेमुळे व चुकीच्या धोरणामुळे पेट्रोल,डिझेल,गॅस, इंधन दरवाढ झाल्यामुळें सर्वसामान्य जनतेचा कंबरडं मोडल आहे. आज प्रदेशाध्यक्ष ना. जयंत पाटील साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली लातूर येथील छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे प्रतीकात्मक चुलीवर भाकरी तयार करण्यात आले आणि राष्ट्रवादी जिल्हाध्यक्ष तथा आमदार बाबासाहेबजी पाटील साहेब व शिक्षक आमदार विक्रम काळे साहेब यांनी सायकल चालवून केंद्र सरकारच्या सातत्याने वाढणाऱ्या घरगुती गॅस, इंधन दरवाढ आणि महागाईच्या विरोधात आंदोलन करून केंद्र सरकारचा जाहीर निषेध व्यक्त केला. या आंदोलनात राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष आमदार बाबासाहेब पाटील साहेब, शिक्षक आमदार विक्रमजी काळे, शहर अध्यक्ष मकरंदजी सावे, शहर कार्याध्यक्ष प्रशांतजी पाटील, यांच्यासह जिल्ह्यातील सर्व पदाधिकारी, तालुका अध्यक्ष जिल्हाध्यक्ष, सर्व सेल महिला, युवक विद्यार्थी, पदाधिकारी व कार्यकर्त्यांचा सहभाग होता.

About The Author