निबंध,वक्तृत्व व वादविवाद मंडळाच्या अध्यक्षपदी श्वेता हुनसनाले
उदगीर (एल.पी.उगीले) येथील
श्री हावगीस्वामी महाविद्यालयात शैक्षणिक वर्ष २०२४-२५ साठी निबंध,वक्तृत्व व वादविवाद मंडळाची स्थापना करण्यात आली. मंडळाच्या अध्यक्षपदी कु.श्वेता बळीराम हुनसनाले बी.कॉम. तृतीय वर्ष तर सचिव म्हणून मयुरेश स्वामी यांची बिनविरोध निवड करण्यात आली.
सदरील मंडळात सदस्य म्हणून साक्षी डोंगरे, विशाल गोटमुकले, स्वाती बागडी, कोमल घेरे, प्रांजल स्वामी, शुभांगी बिरादार, माया सूर्यवंशी, अक्षय दुवे, निकिता स्वामी, जिया बदलानी, प्रांजली स्वामी, संदीप भुजबळे, वैष्णवी कोटलवार, आकाश पांचाळ इत्यादी कार्यरत आहेत.
विद्यार्थ्यांचे लेखन कौशल्य व संभाषण कौशल्य विकसित व्हावे,या उद्देशाने हे मंडळ कार्यरत आहे. या मंडळाच्या वतीने विविध उपक्रम प्रत्येकवर्षी राबविले जातात.
याबद्दल भारत लिबरल एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष ॲड. गुणवंतराव पाटील हैबतपूरकर, सचिव उमेश पाटील देवणीकर, उपाध्यक्ष शिवकुमार हसरगुंडे, संगमेश्वर जिरगे, सहसचिव प्रभूराज कप्पीकेरे, कोषाध्यक्ष शंकरप्पा हरकरे, संस्थेचे सर्व सन्माननीय सदस्य, प्र.प्राचार्य डॉ.एन.जी.
एमेकर , उपप्राचार्य डॉ.ए.ए.काळगापुरे, निबंध, वक्तृत्व व वादविवाद मंडळ समितीचे प्रमुख डॉ.म.ई.तंगावार ,सदस्य डॉ.उषा धसवाडीकर, डॉ.दत्ताहरी होनराव, प्रा.धनराज बंडे, प्रा.अजित रंगदळ, प्रा.जे.डी.संपाळे, प्रा.एन.आर.हाके, प्रा.मनोहर भालके तसेच महाविद्यालयातील प्राध्यापक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी अभिनंदन केले.