एक वृक्ष ,एक जीवन उपक्रमांतर्गत अडीचशे विद्यार्थ्यांनी अहमदपूरात केली तुळशी लागवड….
दिव्य मराठी, आहिल्यादेवी होळकर विद्यालय व रोटरी क्लब यांचा सहभाग.
अहमदपूर ( गोविंद काळे )
दैनिक दिव्य मराठीच्या एक वृक्ष एक जीवन या उपक्रमात अहमदपूर येथील अहिल्यादेवी होळकर विद्यालयाच्या अडीचशे विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवत तुळशी ची लागवड केली.
या उपक्रमामध्ये दैनिक दिव्य मराठी, रोटरी क्लब अहमदपूर व अहिल्यादेवी होळकर विद्यालय यांनी नियोजनपूर्वक प्रयत्न करत विद्यालयाच्या कॅम्पसमध्ये तुळशीच्या बियाचे रोपण केले.
विद्यार्थ्यांना वृक्ष लागवड, वृक्ष संवर्धन व पर्यावरण याविषयी माहिती सांगा भविष्यात निर्माण होणारे धोके याबद्दल जागृत करण्यात आले.
या या बिया लागवड कार्यक्रमामध्ये तुळशीच्या बिया बरोबर इतर भारतीय वृक्षांच्या बिया सुद्धा विद्यार्थ्यांना लागवडीसाठी देण्यात आल्या.
या कार्यक्रमासाठी रोटरी क्लबचे अध्यक्ष राजेंद्र कल्याणे, पुढील अध्यक्ष कपिल बिरादार, विद्यालयाचे मुख्याध्यापक प्रशांत माने, दिव्य मराठी चे अनिल चवळे. शाळेतील शिक्षक व विद्यार्थ्यांनी उत्साहाने सहभाग नोंदवला.
दैनिक दिव्य मराठी मे राबवलेल्या या उपक्रमाचे जनमानसातून कौतुकी ही होत आहे व स्वागत केले जात आहे.
पर्यावरणात होत असलेले बदल, व यामुळे मानवी जीवनावर होणारा परिणाम याबद्दल जागरूकता निर्माण करण्यासाठी या अभियानाचे आयोजन करण्यात आले.
दिव्या मराठीचे प्रतिनिधी व रोटेरी डिस्ट्रिक्ट थ्री वन थ्री टू चे पर्यावरण डायरेक्टर अनिल चवळे यांनी विद्यार्थ्यांना पर्यावरणाविषयी ,वृक्ष संगोपन व वृक्ष लागवड विषयी सखोल मार्गदर्शन केले.
या कार्यक्रमाच्या आयोजनासाठी अहिल्यादेवी होळकर विद्यालयाचे मुख्याध्यापक प्रशांत माने व शाळेतील सर्व शिक्षक बांधवांनी पुढाकार घेतला.
रोटरी क्लब अहमदपूर ने या कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी
सहकार्य केले.