आय एम ए संघटनेचा देशव्यापी संपाला पाठिंबा
उदगीर (एल.पी.उगीले) आय एम ए संघटनेचा देशव्यापी संप होता. या संपाला उदगीर लॅब असोशियन संघटनेने संपात भाग घेऊन, त्यांना समर्थन दिले. एक तरुण डॉक्टर विद्यार्थिनी ड्युटीवर असताना बलात्कार करून, हत्या करण्यात आली. घटनेचा निषेध व्यक्त करण्यासाठी उदगीर लॅब असोशियन आय एम ए संघटनेच्या देशव्यापी संपामध्ये सामील झाली. यावेळी आय एम ए चे अध्यक्ष डॉ. बाळासाहेब पाटील, व सर्व डॉक्टर व तसेच मेडिकल व लॅब टेक्निशियन उदगीरचे अध्यक्ष बळवंत चिंचोलकर, अनिल बिराजदार, सिद्धू शेटकर, नंदू जलशिंगे, बशीर शेख, विजय चिखले, रामेश्वर फुलारी, साहिल चिस्ती, उमेर हाशमी, तौफिक, कालिदास चव्हाण, सतीश पतंगे, तुषार ढोणे, शिवराज कुमठेकर, व सर्व लॅब टेक्निशियन यावेळी उपस्थित होते.