जागतिक ऐक्य निर्माण करण्याचे काम रोटरीच्या माध्यमातून बघायला मिळते
माजी केंद्रीय गृहमंत्री श्री शिवराज पाटील यांचे प्रतिपादन
लातूर (प्रतिनिधी) : रोटरीचे कार्य स्थानिक पातळीवर, प्रांताचे पातळीवर, देशाचे पातळीवर व जगाच्या पातळीवर चालते. जगाचे एक राज्य व्हावे ही कल्पना होती. त्यातूनच लीग ऑफ नेशनची संकल्पना पुढे आली नंतर दुसरे महायुद्ध झाले व त्यातून संयुक्त राष्ट्रसंघाची निर्मिती झाली.
संपूर्ण जगामध्ये सामंजस्य असावे, एकमेकात सहकार्य असावे, यासाठी निरनिराळ्या पातळीवरून युनायटेड नेशन चे कार्य चालते जगाचे एक राज्य झाले नाही, परंतु युनायटेड नेशनच्या मागे जागतिक पातळीवर काम करण्याची कल्पना आहेच.
अंतरराष्ट्रीय पातळीवर रोटरीच्या निरनिराळ्या संस्थामार्फत देवाण घेवाण, गरजूंना मदत होत असते. जगातील लोक एकोप्याने रहावेत, अपसामध्ये सामंजस्य असावे अशीच भावना रोटरीच्या कार्यातून बघायला मिळते, असे प्रतिपादन केंद्रीय माजी गृहमंत्री मा. श्री. शिवराज पाटील चाकूरकर यांनी केले.
महाराष्ट्रातील ११ जिल्ह्याच्या विभागाचे लातूरचे नूतन गवर्नर डॉ. ओमप्रकाश मोतीपवळे यांच्या पदग्रहण संभारंभानिमित्त प्रमुख पाहुणे म्हणून मा. डॉ. शिवराज पाटील बोलत होते. या प्रसंगी व्यासपिठावर डॉ. श्री. महेश कोटबागी, श्री. मोटवानी, परभणी कृषी विद्यापिठाचे कुलगुरू डॉ. श्री. अशोक ढवण, लातूरचे नूतन गवर्नर डॉ. श्री. ओमप्रकाश मोतीपवळे, ऍड. सविता मोतीपवळे व्यासपिठावर उपस्थित होते.
मा. शिवराज पाटील चाकूरकर यांचे गवर्नर डॉ. ओमप्रकाश मोतीपवळे यांनी स्वागत केले. आपल्या भाषणात पुढे बोलतांना मा. श्री. शिवराज पाटील यांनी म्हटले की, सर्व माणसे सारखी आहेत त्यांचेकडे समान भावनेने बघणे ही भावना रोटरीच्या कार्यातून बघायला मिळते व्यक्तिला व्यावहारिक ज्ञान प्राप्त करून समाजात वावरावे लागते. त्यातील वैज्ञानिकता समजून घेवून व त्याचा उपयोग करून नवीन दृष्टीकोण ठेवून वावरावे लागते, त्याचबरोबर त्याला आध्यात्माची जोड मिळाली तर त्याचे स्वतः चे जीवन तर सुखी होतेच परंतु इतरांचे व पर्यायाने समाज जीवन सुखी होण्यासाठी साह्य होते. असे प्रतिपादन करून रोटरीच्या कार्याला शुभेच्छा दिल्या व नूतन गवर्नर डॉ. ओमप्रकाश मोतीपवळे यांचे अभिनदंन केले.
या प्रसंगी आपल्या भाषणातून लातूर रोटरी गवर्नर डॉ. ओमप्रकाश मोतीपवळे यांनी रोटरीच्या गवर्नवरपदी बिनविरोध निवड केल्याबद्दल सर्व रोटरियन्सचे आभार मानले व या पदग्रहण कार्यक्रमास देशाचे नेते व विचारवंत मा. शिवराजजी पाटील उपस्थित राहिल्या बद्दल कृतज्ञता व्यक्त केली. जगाचे नुकसान व्हायलन्सने( Voilence) होत नाही तर चांगल्या व्यक्तींच्या सायलन्सने ( Silence) मुळे होते म्हणून पाटील साहेबांनी सद्याच्या गोंधळाच्या परिस्थितीतून सर्वाना बाहेर काढण्यासाठी व नवी दिशादेण्यासाठी बोलले पाहिजे ही आपेक्षा व्यक्त केली सर्वाना बाहेर काढण्यासाठी व नवी दिशा देण्यासाठी बोलले पाहिजे ही आपेक्षा व्यक्त करतानाच मा. शिवराज पाटील यांच्या कारकिर्दीचा आढावा सर्व रोटेरियन्सनी समोर ठेववा. मोठमोठ्या संस्था गाजावाजा न करता निर्माण केल्या हे सांगतानाच ‘हम सबके सब हमारे’ अशा त्यांच्या जीवनाच्या सूत्राचा उल्लेख केला.
कुलगुरू डॉ. अशोक ढवण यांनी संक्षिप्त स्वरूपात रोटरी कार्यक्रमास शुभेच्छा देवून डॉ. ओमप्रकाश मोतीपवळे यांचे कौतूक व अभिनंदन केले.
डॉ. महेश कोटबागी यांनी मा. शिवराज पाटील साहेब यांचे सारख्या थोर व्यक्तीच्या उपस्थिती बद्दल आनंद व्यक्त करून रोटरीसाठी ही भाग्याची गोष्ट असल्याचे प्रतिपादन करून रोटरीच्या भविष्यातील कांही उपक्रमांचा उल्लेख केला व संबंधित व्यक्तींचे अभिनंदन केले.
याप्रसंगी डॉ. मोटवानी डॉ. श्री. सुधीर लातूरे यांची यथोचित भाषणे झाली. डॉ. अर्चनापाटील चाकूरकर, ऍड. सांबप्पा गिरवलकर, माजी आमदार श्री. वैजनाथराव शिंदे, ऍड. व्यंकटराव बेद्रे, प्राध्यापक ऍड. मोतीपवळे, माजी आमदार श्री. धर्माजी सोनकवडे, श्री. चंद्रशेखर पाटील, विविध रोटरी क्लबचे अध्यक्ष इतर पदाधिकारी उपस्थित होते. कोवीड १९ च्या परिस्थितीमुळे शासनाचे परवानगीने सर्व नियम पाळून कार्यक्रम संपन्न झाला. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन रो. लक्ष्मीकांत सोनी व रो. धनश्री केळकर यांनी केले. सर्वाचे आभार रो. मेहूल कामदार यांनी मानले. कार्यक्राचे प्रास्तविक रो. संजय बोरा यांनी केले तर सदरील कार्यक्रमात रो. शशीकांत मोरलावार यांनी मान्यवरांना कॉल ऑन डायस केले. माजी प्रांतपाल रो. हरिप्रसाद सोमाणी, रो. प्रमोद पारीख, रो.रविंद्रदादा साळुंके, रो.व्यंकटेश चन्ना, रो. शिरीष रायते, रो. डॉ. दिपक पोफळे, रो. झुबीन अमेरिया, रो. आप्पासाहेब पाटील उपस्थित होते.