संत ज्ञानेश्वर विद्यालयात ध्वजारोहण उत्साहात संपन्न
अहमदपूर ( गोविंद काळे ) येथील संत ज्ञानेश्वर प्राथमिक व माध्यमिक विद्यालयात 15 ऑगस्ट 2024 रोजी 78 वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा करण्यात आला. विद्यालयात 7:35 वाजता संस्थेचे अध्यक्ष मा.गणेश दादा हाके पाटील यांच्या हस्ते ध्वजारोहणाचा कार्यक्रम मोठ्या उत्साहात संपन्न झाला . यावेळी भारतीय जनता पार्टीचे जिल्हाध्यक्ष दिलीपरावजी देशमुख, शाळेच्या मुख्याध्यापक आशा रोडगे, मुख्याध्यापक मीना तोवर सह माता पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या प्रारंभी राष्ट्रपिता महात्मा गांधी व भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. यावेळी विद्यार्थ्यांनी विविध नेत्यांची, क्रांतिकारकांची वेशभूषा केली होती. देशभक्तीपर गीत गायन स्पर्धेत, नृत्य स्पर्धेत, भाषण स्पर्धेत, वेशभूषेत प्रथम, द्वितीय, तृतीय येणाऱ्या विद्यार्थ्यांना मुख्याध्यापिका आशा रोडगे, प्रमुख पाहुणे नवनाथ हांडे, हरिहर सोनवणे यांच्या हस्ते बक्षीस देऊन कौतुक करण्यात आले. तसेच मंथन टॅलेंट सर्च परीक्षेतील गुणवंत विद्यार्थ्यांना मान्यवरांच्या हस्ते सन्मान चिन्ह देऊन गौरविण्यात आले.
भाजपा प्रदेश प्रवक्ते गणेश दादा हाके व जिल्हाध्यक्ष दिलीपराव देशमुख यांचे मनोगत पर भाषणे झाली. शेवटी विद्यार्थ्यांना अल्पोपहार व केळी वाटप करण्यात आली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक सतिश साबणे यांनी केले.सूत्रसंचालन नंदकुमार मद्देवाड व शारदा तिरुके यांनी केले. तर आभार मुख्याध्यापिका मीना तोवर यांनी मानले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी विशेष परिश्रम घेतले.यावेळी विद्यार्थी व पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.