अहमदपूरात ‘मार्टी’ च्या कृती समिती पदाधिकाऱ्यांचा सत्कार
आमदार बाबासाहेब पाटील यांची प्रमुख उपस्थिती
अहमदपूर ( गोविंद काळे )येथील शासकीय विश्रामग्रहावर मुस्लिम समाजातील युवक युवतींना प्रगतीच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी राज्य शासनाकडून मौलाना आझाद संशोधन, प्रशिक्षण संस्था (मार्टी) मंजुरी मिळाल्याबद्दल मार्टी कृती समिती च्या पदाधिकाऱ्यांचा आमदार बाबासाहेब पाटील यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
या मार्टीच्या कृती समितीतील, मुंबई (अहमदपूर) सचिव ॲड. शेहबाज पठाण, बीड मार्टी कृती समिती सदस्य नबील उज जमा, छत्रपती संभाजी नगर (औरंगाबाद) येथील अब्दुल राफे यांचा सत्कार आमदार बाबासाहेब पाटील यांच्या हस्ते करण्यात आला.
महायुती सरकारने अल्पसंख्यांक मुस्लिम समाजाच्या विकासासाठी एमआरटीआय (मार्टी) ची स्थापना केल्याबद्दल अहमदपूर येथील नागरिकांनी अहमदपूर येथील विश्राम ग्रहावर केलेल्या सत्काराचा स्वीकार केल्यानंतर आमदार बाबासाहेब पाटील यांनी आभार मानून राज्यातील अल्पसंख्याक बांधवांचे मागासलेपण दूर करुन त्यांच्या सर्वांगीण विकासासाठी ‘एमआरटीआय’ (मार्टी)ची स्थापना करण्याचा महायुती सरकारने घेतलेला निर्णय अभूतपूर्व आहे. मुस्लिम, अल्पसंख्याक बांधवांच्या विकास योजनांना गती मिळावी, त्यांचा सर्वांगीण विकास व्हावा हा हेतू मार्टीच्या स्थापनेने १०० % सफल होईल हा विश्वास असल्याचे दैनिक आदर्श भारत च्या प्रतिनिधी ना सांगितले.
या सत्कार समारंभाचे आयोजन उद्योजक इलियासभाई सय्यद, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शहराध्यक्ष अझहरभाई बागवान यांनी केले होते. यावेळी प्रदेश सरचिटणीस शिवानंद हेंगणे, बाबुभाई रुईकर , माजी नगरसेवक अभय मिरकले, माजी नगरसेवक रहिमखान पठाण, अय्याज शेख, जावेद बागवान, हुसेन मणियार, फिरोज शेख यांच्यासह असंख्य समाज बांधव उपस्थित होते.