1121 फुट लांब तिरंगा ध्वज रॅलीने अहमदपूर शहर दुमदुमले
अहमदपूर ( गोविंद काळे ) स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाच्या निमित्ताने सम्राट मित्र मंडळ, नगरपरिषद आणि महात्मा गांधी महाविद्यालयाच्या वतीने आयोजित केलेल्या 1121 फूट लांबीच्या शौर्य व त्यागाचे प्रतीक असलेला तिरंगा ध्वज प्रतिकृती रॅलीने अहमदपूरकरांचे लक्ष वेधून घेतले. या रॅलीने व देशभक्तींच्या जय घोषणाने अहमदपूर शहर दुमदुमले.
या कार्यक्रमाच्या अध्यक्षपदी माजी आमदार बब्रुवान खंदाडे हे होते. या रॅलीचे उद्घाटन विशेष पोलीस महानिरीक्षक शहाजी उमाप यांच्या हस्ते फीत कापून करण्यात आले.या कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून लातूरचे पोलीस अधीक्षक सोमय मुंडे, भाजपा जिल्हाध्यक्ष दिलीपराव देशमुख,गणेशदादा हाके पाटील,अशोकराव केंद्रे, अयोध्याताई केंद्रे, उपजिल्हाधिकारी मंजुषा लटपटे,तहसीलदार उज्वला पांगरकर, उपविभागीय पोलीस अधिकारी मनीष कल्याणकर, पोलीस निरीक्षक विरप्पा भुसनूर, विचार विकास मंडळाचे अध्यक्ष अँड.किशनराव बेंडकुळे, सचिव अँड.पी.डी.कदम, रामचंद्र शेळके,सुरेशराव देशमुख,अँड.वसंतराव फड, प्राचार्य एस.आर.शेळके, प्रा.गुणवंत ताटे, एन.एस. एस.प्रमुख प्रा. वाय. आर. सूर्यवंशी,भाजपा शहराध्यक्ष सुशांत गुणाले, प्रदीप खोमणे,आण्णाराव सुर्यवंशी, माजी नगराध्यक्षा सौ. सरस्वती कांबळे, पंचायत समिती माजी उपसभापती बालाजी गुट्टे, युवा मोर्चाचे तालुकाध्यक्ष रामानंद मुंडे, ज्ञानोबा बडगीरे आदींची प्रमुख उपस्थिती होती.
सदरील रॅली छत्रपती शिवाजी महाराज चौक, हनुमान मंदिर, शहीद गौतम वाघमारे चौक, डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा ते सावरकर चौक या मार्गाने येऊन छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे राष्ट्रगीताने व राज्य गिताने रॅलीचा समारोप करण्यात आला.
यावेळी तिरंगा ध्वजावर विविध ठिकाणी दोन चौकात जेसीबी च्या सहाय्याने पुष्पवृष्टी करण्यात आली.
अहमदपूर शहरातील नागरिक उत्साहाने व आनंदाने तिरंगा रॅलीवर आदराने पुष्पवृष्टी करत होते.या रॅलीमध्ये भारत माता की जय, स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव चिरायू होवो,जय हिंद,अशा राष्ट्र प्रेरक घोषणांनी संपूर्ण अहमदपूर शहर दुमदुमून गेले होते.एकूणच या तिरंगा रॅलीने राष्ट्रभक्तीचे स्फुल्लिंग चेतवण्याचे काम केले, हा अमृत महोत्सव व स्वातंत्र्य दिन उत्सव,जन भागीदारी आणि जन आंदोलनच्या भावनेने साजरा करण्यात आला.भारतीय स्वतंत्र्याच्या अमृत महोत्सव वर्षानिमित्त सर्व अहमदपूरकरांनी मुख्य रस्त्यावरील 1121 फूट महाकाय तिरंगा ध्वजाची रॅली पाहून आश्चर्य व्यक्त करत होते.
या तिरंगा रॅलीसाठी लातूर जिल्हा पोलीस यांचे पोलीस बँड पथक यांच्या मधुर संगीतमय राष्ट्रगीतासह विविध राष्ट्रभक्तीपर गीताने सर्वांना मंत्रमुग्ध करून सोडले होते.
या तिरंगा रॅलीमध्ये महात्मा गांधी महाविद्यालय,महात्मा फूले महाविद्यालयाचे प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी विद्यार्थी, एन.सी.सी.,एन. एस. एस., स्काॅऊट गाईड प्रशिक्षणार्थी विद्यार्थी,नगर परिषदेचे कर्मचारी, तसेच ज्ञानदीप भरतीपूर्व पोलिस प्रशिक्षणार्थी सह विविध शाळा महाविद्यालयाचे विद्यार्थी यांनी सहभाग नोंदविला.या रॅलीत रॅलीत विद्यार्थ्यांच्या हातात भारतीय राष्ट्रपुरुष छत्रपती शिवाजी महाराज, स्वातंत्र्यवीर वि.दा. सावरकर ,सुभाषचंद्र बोस ,डॉ.बाबासाहेब आंबेडकर इत्यादी महापुरुषां बरोबरच राष्ट्रपुरुषांच्या फोटो असलेले फलक अहमदपूर शहरातील मुख्य रस्ता विद्यार्थ्यांच्या हातातील तिरंग्याने गजबजुन गेला होता.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक सम्राट मित्र मंडळाचे अध्यक्ष तथा युवक नेते डॉ. सिद्धार्थकुमार सूर्यवंशी यांनी केले.कार्यक्रमाचे आभार तबरेज सय्यद यांनी मानले.
रॅलीचा समारोप राष्ट्रगीत व राज्यगितांनी करण्यात आला. डोळ्याचे पारणे फिटावेत, राष्ट्राच्या प्रती उर भरून यावा असा देखणा सोहळा स्वातंत्र्यदिनाच्या निमित्ताने अहमदपूरकरांनी पाहिला.
सदरील रॅली यशस्वी करण्यासाठी आंबेडकरी चळवळीतील जेष्ठ नेते गोपीनाथराव जोंधळे,अँड.सुभाष सोनकांबळे,प्रशांत जाभाडे ,आकाश सांगवीकर , शरद सोनकांबळे,विलास चापोलीकर, प्रा. डॉ. बालाजी कारामुंगीकर, राहुल सुर्यवंशी,पत्रकार भीमराव कांबळे , गणेश मुंडे, त्रिशरण मोहगावकर, सचिन बानाटे, शरद सोनकांबळे, प्रदीप कांबळे , प्रकाश लांडगे, आकाश पवार, माणिक वाघमारे, रमेश कांबळे, महंमद पठाण, हर्षवर्धन हावरगेकर,जंगले सतीश, अनिल वाघमारे, रितेश रायभोळे, सावळाराम बनसोडे, सतिश कदम, सिध्दार्थ वाघमारे, संविधान कदम, दिनेश तिगोटे, दिलीप सोनकांबळे, रोहण गायकवाड आदींनी परिश्रम घेतले.