पर्यावरण संवर्धनासाठी वृक्षारोपण सक्तीचे होणे ही काळाची गरज – आत्तार फय्याज
उदगीर ( प्रतिनिधी ) : पर्यावरण संरक्षणासाठी झाडे लावणे गरजेचे आहे. हे काम जर सामाजिक जाणिवा ठेऊन होत नसेल तर त्या साठी सक्ती करावी. असे विचार आत्तर फयाज यांनी व्यक्त केले.
कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती श्री सिद्धेश्वर मुन्ना पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त निडेबन ग्रामपंचायतच्या वतीने वृक्षारोपण कार्यक्रम घेण्यात आला.या प्रसंगी ते बोलत होते.
वाढदिवस कार्यक्रम प्रसंगी
निडेबन ग्रामपंचायतीचे उपसरपंच फय्याज आत्तार (पप्पू भाई) म्हणाले की, पर्यावरणावर केले जाणारे आघात थांबवण्यासाठी व मानवाला निरोगी राहण्यासाठी वृक्षारोपण ही काळाची गरज आहे, जसे की शासकीय ध्येयधोरणानुसार एखाद्या जमिनीचा उतारा घेताना त्याचे क्षेत्र विचारात घेतले जाते, त्याचप्रमाणे त्या क्षेत्राप्रमाणे झाडे लावण्याची सक्ती करायला हवी, जो विचार अहिल्यामाई होळकर यांच्या कारकिर्दीत सर्वांना लागू होता.तो आताही लागू केला पाहिजे,असे सांगितले. यावेळी शिंदे दशरथ, निडेबन ग्रामपंचायतीचे लिपिक मनोज मनदुमले, शेख शिराज यांच्यासह निडेबन ग्रामपंचायतीचे सदस्य, कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. हा कार्यक्रम कोरोणाच्या पार्श्वभूमीवर सोशल डिस्टन्स ठेवून साजरा करण्यात आला.