जिल्हा फलोत्पादन अधिकारी यांची गंगनबिड येथे प्रगत शेतकरी अंकुश वाडीकर  यांच्या शेती प्रकल्पास भेट 

जिल्हा फलोत्पादन अधिकारी यांची गंगनबिड येथे प्रगत शेतकरी अंकुश वाडीकर  यांच्या शेती प्रकल्पास भेट 

गंगणबीड (प्रतिनिधी) : सीमाभागातील बिदर जिल्ह्यातील कमालनगर तालुक्यातील दापका परिसरातील गंगनबिड येथे कमालनगर तालुक्यातील उत्कृष्ट सन्मानित शेतकरी श्री  अंकूश लक्षमणराव वाडीकर यांच्या शेतातील उत्तकृष्ट मिरची पिकाची पाहणी करण्यासाठी  जिल्हा फलोत्पादन अधिकारी; श्री विश्वनाथ जिरळे  व सर्कल फलोत्पादन अधिकारी श्री  विंरभद्रेश्वर  होडाळे यांनी भेट दिली. हालकी जमिनीवर मिरची लागवड  पाहनी करून प्रत्यक्षात दंग झाले, मिरचीचे अप्रतिम  पिक आले आहे, माळावरची ही जमीन पाहून  पावसात  शेताच्या बांधावर न थांबता चिखलात  चारही बाजूंनी पाहणी केली आहे. त्यांनी  शेतकरी यांच्या कडून आधुनिक शेती  कशा पध्दतीने करावी?  शेतीतील  पिके मिरची, टोमॅटो, उत्कृष्ट उत्पादन घेण्यासाठी  कोणती पिके कशा पद्धतीने घेतली जातात?  तसेच मिरची बियाणे अंकूर 930 वाणाची लागवड करताना कशा पद्धतीने काळजी  तूम्ही घेतली? , जमीनची कशी  मशागत केली? मलचींग पेपरची योग्य अच्छादन या सर्व विषयांवर सविस्तर चर्चा  करून घेतली,  जिल्हा फलोत्पादन  अधिकारी मिरची, टोमॅटो, आद्रक, तरकारी नगदी पिके पाहून समाधानकारक शेतीचे उत्पादन विविध पद्धती घेतना  कशा पद्धतीने काळजी घ्यावी?, शेतकरी, कामगार यानी नगदी पिकाची लागवड, वाढ, रोगाचा प्रादुर्भाव झाल्यास कशी काळजी घ्यावी? ही सखोल विचार माहिती जिल्हा अधिकारी यांनी  मार्गदर्शन केले. सर्कल अधिकारी यांनी सांगितले की, मागच्या वर्षी उत्पादन मुबलक काढण्यात वाडीकर अंकुशराव यांच्या  सिंहाचा वाटा आहे,  या वेळी श्री लक्षमणराव वाडीकर, किशनराव पाटील, गोविंद वाडीकर, अशोक वाडीकर, चंद्रपाल वाडीकर, संतोष राठोड, लव्हु वाडीकर,धिरज किरण राठोड, अविनाश पवार, इ, शेतकरी उपस्थित होते.

About The Author