कासार सिरसी येथे आमदार अभिमन्यू पवार यांचा जंगी स्वागत सत्कार

कासार सिरसी येथे आमदार अभिमन्यू पवार यांचा जंगी स्वागत सत्कार

कासार सिरसी (बालाजी मिलगीरे) : कासार शिरशी येथे आमदार अभिमन्यू पवार यांच अल्गीच्या पथकासह, असंख्य कार्यकर्त्यांसह शेहरामध्ये जंगी मिरवणूक कडून स्वागत करण्यात आले. तसेच महाआघाडी सरकारविरोधात घोषणाबाजी देण्यात आले. मी जनतेचा अडीअडचणी सोडविण्यासाठी आमदार आहे जनतेला त्यांचं हक्क मिळवून देण्यासाठी लढणारा आमदार आहे ओबीसी समाजाच्या आरक्षणाचा कायम ठेवण्यात यावे या मागणीसाठी विधिमंडळात आवाज उठले असता माझा आवाज दाबण्याचा प्रयत्न केले आणि मला निलंबित करण्यात आले असे निलंबन केल्याने मी गफ बसणार नाही मी तुमच्यासाठी सदैव लढत राहणार असा येथील शिवाजी चॊकात जमलेल्या कार्यकर्त्याना यावेळे वचन आमदार अभिमन्यू पवार यांनी दिले.

यावेळी भारतीय जनता पार्टी मंडळ अध्यक्ष ज्ञानेश्वर वाकडे, निलंगा पंचायत समितीचे माजी सभापती अजित माने, आमदार पवारसाहेबाचे स्वीय सहाय्यक गिरीशभाऊ तुळजापूरे, मंडळ संघटक धनराज होळकुंदे, युवा मोर्चा अध्यक्ष परमेश्वर बिराजदार, अल्पसंख्यांक अध्यक्ष जिलानी बागवान, सचिन पाटील, ओम बिराजदार, शहराध्यक्ष गोरख होळकुंदे ग्राम पंचायत सदस्य सतिष गुप्ता नारायण डोमाळे, भास्कर पाटील, उमेश बुकले, सायबा कानडे, किरण किवडे, धोंडीराम बिराजदार, अन्य कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. पुढे बोलताना आमदार म्हणाले सर्वसाधारण जनतेच्या हक्कासाठी मला किती ही वेळा निलंबन केले तरीही मला या गोष्टीचा तिळमात्र दुख नाही. हा तुम्ही पाठवलेला तुमचा आमदार तुमच्या हितासाठी, तुमचं अडीअडचणी सोडविण्यासाठी, तुमच्यावर होत असलेला अन्यायवर वाच्चा पोडणारा आहे तुमचा अधिकार जर कोणी हिसकावून घेत असेल ते मी खपून घेणार नाही. यापुढे ओबीसी आरक्षण कायम ठेवण्यात सरकारला भाग पडणार असे यावेळी आमदार अभिमन्यू पवार यांनी जनतेला गवई दिले.

About The Author