आय. एम. ए. उदगीर च्या अध्यक्षपदी डॉ. बाळासाहेब पाटील तर सचिवपदी डॉ. महेश जाधव
उदगीर (एल.पी.उगीले) : इंडियन मेडिकल असोसिएशन(आय.एम.ए), उदगीरच्या 2021-22 या वर्षीकरिताच्या नूतन कार्यकारिणीची निवड करण्यासाठी उदगीर तालुक्यातील अॅलोपॅथी (एमबीबीएस;डिप्लोमा, एम.डी.;एम.एस.या पदवी-पदव्युत्तर) चिकित्सा पद्धतीच्या सर्व वैद्यकीय व्यवसायिकांची बैठक अत्यंत खेळीमेळीच्या वातावरणात संपन्न झाली.
नुतन कार्यकारिणी मध्ये अध्यक्षपदी डॉ.बाळासाहेब पाटील,सचिवपदी डाॅ.महेश जाधव,उपाध्यक्षपदी डाॅ.तानाजी मोरे, डाॅ.नितीन गुरुडे, कोषाध्यक्षपदी डाॅ.संगमेश्वर दाचावार, सहसचिवपदी डाॅ.अत्तार जावेद, डाॅ.यशोधन सताळकर, डॉ.नवनाथ सोनाळे तर महिला प्रतिनिधीपदी डॉ.सविता पदातुरे, डाॅ.ज्योती सोमवंशी आणि इव्हेंट इन्चार्ज डाॅ.प्रविण मुंदडा, डाॅ.प्रशांत माने, डाॅ.श्रीकांत शेळकीकर, बुलेटीन इन्चार्ज डाॅ.संजय चिल्लरगे यांची निवड करण्यात आली.
नुतन पदाधिकार्यांचे डाॅ.दत्तात्रय पवार, डाॅ.माधव चंबुले, डाॅ.संजय कुलकर्णी, डॉ.संतोष पांचाळ, डाॅ.विजय केंद्रे, डाॅ.शशिकात देशपांडे, डाॅ.मनोहर सूर्यवंशी, डाॅ.मन्मथ देलमाडे,डाॅ.व्यंकटेश मलगे, डाॅ.प्रदीप जटाळे यांच्यासह विविध चिकित्सा पद्धतींचे डॉक्टर्स तथा अनेक क्षेत्रातील मान्यवरांनी अभिनंदन करुन त्यांच्या विविध आरोग्यविषयक तथा अन्य उपक्रमांसाठी व पुढील यशस्वी वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या आहेत.