वृक्षलागवड व संर्वधन ही काळाजी गरज  उपजिल्हाधिकारी श्री गणेश महाडिक 

वृक्षलागवड व संर्वधन ही काळाजी गरज  उपजिल्हाधिकारी श्री गणेश महाडिक 

लातूर (एल.पी.उगीले) : धनेगांव ता देवणी येथे आ. संभाजीराव पाटील निंलगेकर यांच्या वाढदिवसानिमीत्ताने धनेगांव येथे स्मशान भुमी परिसरात वर्गमित्र आॅक्सिजन हब,  भाजयुमो तालुका अध्यक्ष श्री रामलिंग शेरे यांच्या माध्यमातुन  वृक्षलागवड सप्ताहाचे आयोजन करुन वृक्ष लागवड करण्यात आली आहे , या वृक्षलागवडीची पाहणी करण्यासाठी जिल्हाधिकारी यांचे नोडल अधिकारी म्हणून उपजिल्हा अधिकारी श्री गणेशजी महाडिक  व मनरेगा, बीडीओ श्री  महेंद्र कुलकर्णी यांनी भेट देऊन गावातील महादेव मंदीर परिसरात  करण्यात आलेली वृक्ष लागवड, व गांवअर्तगत  रस्ताच्या दुर्तफा  गतवर्षी लागवड करण्यात आलेल्या  वृक्षाची पाहणी करुन धनेगांव ग्रामस्थांनी  लोकसहभागातुन  ही  वृक्ष लागवड करुन त्याचे संर्वधन  केल्याबद्ल अभिनंदन केले. यावेळी बोलताना  श्री महाडिक  म्हणाले की, आज जर  आपण एकूण सारासार विचार  केला तर पृथ्वीचे आरोग्य राखणे म्हणजे आपले आरोग्य राखण्यासारखेच आहे. पृथ्वीचे आरोग्य राखण्यामध्ये वने, झाडे ही  अतिशय महत्त्वाची भूमिका बजावत असतात. एक मोठे झाड छोटय़ा-छोटय़ा वनस्पती, कीटक, प्राणी-पक्षी यांना आसरा देते. विषारी कार्बन डायऑक्साइड शोषून घेऊन जागतिक तापमानवाढ कमी करतेे, आणि प्राणवायू असलेल्या ऑक्सिजनचे उर्त्सजन करते. वनांमुळे जमिनीची धूप रोखली जाते. जमिनीत पाणी मुरते व पूर-दुष्काळ यांसारख्या आपत्ती रोखण्यास मदत होते. तसेच वनांपासून फळे-फुले, औषधे, मसाले, रंग, जनावरांसाठी चारा, जळणासाठी स् आणि घरबांधणीसाठी लाकूड मिळते.  लातुर येथील शेतकर्‍यानी व्यवसाईक शेतीकडे वळावे, यामध्ये बांबू, फळलागवड ,याकडे प्रामुख्खाने लक्ष द्यावे. यामुळे वृक्षलागवड ही होईल व शेतकर्‍यानां यामाध्यमातुन रोजगार ही उपलब्ध होईल. 

यावेळी देवणीची तहसिलदार श्री सुरेशजी घोळवे, सहाय्यक गटविकास अधिकारी श्री अच्युत पाटील, सरपंच पती श्री हरिभाऊ परीट, उपसंरपंच श्री रविद्रकुमार पाटील, भाजयुमो तालुका अध्यक्ष श्री रामलिंग शेरे, ग्रामसेवक श्रीकात पताळे, श्री बाळासाहेब बिरादार, श्री दिपक पवार, श्री लक्ष्मण पवार, श्री सखाराम चव्हाण, श्री अनिल राठोड, श्री अमित बिरादार,श्री बालाजी बिरादार, श्री शंकर आपटे, श्री ज्ञानेश्वर बिरादार, आदिसह ग्रामस्थ व नागरिक उपस्थित होते.

About The Author