छाया साखरे यांना एक्स्लुसिव शाईन अवार्ड तसेच एक्स्लुसिववर्ल्ड रेकोर्ड मध्ये नामांकन
लातूर (एल.पी.उगीले) : लातूर ही जन्मभूमी आसलेल्या छायाजी या हिंदुस्तानी शास्त्रीय गायिका, बॉलीवुडप्लेबेक सिंगर, समाज सेविका, प्रख्यात अभिनेत्री,लोक नृत्य कोरिओग्राफर आणि मुंबई महानगरपालिका पालिका येथील स्पेशल संगीत शिक्षिका तसेच उत्तम म्युझिक डायरेक्टर अश्या एक ना अनेक कौशल्याने परीपुर्ण अशी अष्टपैलू व्यक्तीमत्व असलेल्या मुळत: लातुर,महाराष्ट्रातील रहिवासी परंतु सध्या मुंबई येथे वास्तव्यास असणाऱ्या श्रीमती. छायाजी भानुदास साखरे यांना नुकतेच “एक्लुसिव वर्ल्ड रेकोर्ड” मध्ये बेस्ट म्युझिक टिचर क्लासिकल सिंगर, बॉलीवुडप्लेबेक सिंगर,सोशल एक्टिविटिस्ट म्हणून नामांकन जाहिर झाले आहे. तसेच एक्स्लुसिव शाईन अवार्ड ने आणि युथ आयकोन अवार्ड सन्मान प्राप्ती मुळे महाराष्ट्रातील च नव्हेतर संपुर्ण भारताचे नाव गायन क्षेत्रात प्रभावित केले आहे. श्रीमती छाया साखरे गेल्या अनेक वर्षापासून मुंबईत राहुन कला- साहित्यिक क्षेत्रात, सामाजिक क्षेत्रात तळागाळातील गरीब होतकरु प्रतिभावान मुलांना पुढे नेण्यासाठी सतत प्रयत्नशील असतात. अनेक नवनविन उपक्रम त्यांनी राबविले आहेत गरीब होतकरु, जिद्द चिकाटी असणारे अनेक विद्यार्थी ज्यांच्या मध्ये भरपुर प्रतिभा दडलेली असते अशांची प्रतिभा ओळखुन त्यांचे टेलेंट ला योग्य दिशा देऊन मोठा प्लेटफोर्म मिळावा. याकरिता सतत प्रयत्नशील राहुन विद्यार्थींना स्टेज उपलब्ध करुन देणे, त्यांच्या कलागुणांना वाव मिळावा. याकरिता तसेच आर्थिकद्रुष्ट्या मदत ही छायाजी करतात. श्रीमती साखरेजी यांना मिळालेल्या अनेक पुरस्कारांबद्दल समाजामध्ये सर्वत्र कौतुक आणि अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. हिंदुस्तानी शास्त्रीय गायिका विदुषी,”पद्मभूषण”, श्रीमती डॉ.प्रभा अत्रेजी आणि “पद्मश्री” श्री.अनुप जलोटाजी या दोन्ही सांगितिक क्षेत्रातील छायाजींच्या गुरूंनी त्यांचे खुप कौतुक केले आणि पुढील वाटचाली साठी त्यांचे शुभाशिर्वाद ही त्यांना दिले. याप्रंसंगी छाया साखरे जी नी सांगितले की हा पुरस्कार माझा एकट्या चा नसुन माझे कुटुंब, मित्रपरिवार आणि माझ्या सर्व विद्यार्थींचा आहे. याप्रंसंगी छाया साखरे जी नी सांगितले की हा पुरस्कार माझा एकट्या चा नसुन माझे कुटुंब, मित्रपरिवार आणि माझ्या सर्व विद्यार्थ्यांचा आहे.