काँग्रेस ओबीसी सेल प्रदेशाध्यक्ष भानुदास माळी यांचा सत्कार

काँग्रेस ओबीसी सेल प्रदेशाध्यक्ष भानुदास माळी यांचा सत्कार

लातूर (एल.पी.उगीले) : येथील ओबीसी ब्रिगेडच्या वतीने माळी यांचा सत्कार करण्यात आला. ओबीसी चा राजकीय आरक्षणासंदर्भात विधानसभेत महत्त्वपूर्ण ठराव मांडला त्याबद्दल ओबीसी ब्रिगेडच्या वतीने सरकारचे अभिनंदन करण्यात आले. काही बीजेपीच्या आमदारांनी जो इम्पीरियल डाटा   साठी  विरोध केला होता भाजप आमदारांनी गोंधळ घातला त्याबद्दल त्यांचा निषेध व्यक्त करण्यात आला. ओबीसीसाठी मंडल आयोग लागू करण्यात आल्यानंतर ज्या पक्षांनी वी. पी सिंगचे सरकार पाडले, तेच पक्ष आज ओबीसी साठी चक्काजाम आंदोलन करून ओबीसीचे डोके जाम करून दिशाभूल करण्याचा प्रयत्न करत आहे याचाही निषेध करण्यात आला. या संदर्भात लोक जागृती करून लोकांसमोर सत्य परिस्थिती ठेवून सत्याची जाणीव करून दिली जाईल. असा ठराव मंजूर करण्यात आला. तसेच ओबीसींच्या मागण्या संदर्भात ही चर्चा करण्यात आली. ओबीसी जनगणना झालीच पाहिजे, ओबीसी चे राजकीय आरक्षण परत भेटले पाहिजे, ई. विविध मागणीसाठी ओबीसी ब्रिगेडचे महाराष्ट्र राज्य संपर्कप्रमुख सुदर्शन बोराडे, मराठवाडा अध्यक्ष अजित निंबाळकर व,जिल्हाध्यक्ष दिलीप पिनाटे व महिला शहराध्यक्ष बबीता येलगटे, ओबीसी ब्रिगेडचे पदाधिकारी यांनी ओबीसी च्या मागण्या संदर्भात चर्चा केली व सकारात्मक भूमिका घ्यावी आधी विनंती करण्यात आली.

About The Author

error: Content is protected !!