दिलीपराव देशमुख यांची भाजपा किसान मोर्चाच्या महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस पदी निवड

दिलीपराव देशमुख यांची भाजपा किसान मोर्चाच्या महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस पदी निवड

अहमदपूर (गोविंद काळे) : 2019 च्या विधानसभा निवडणुकीतील अपक्ष उमेदवार दिलीपराव देशमुख यांनी नुकताच भारतीय जनता पार्टीत प्रवेश केला असून भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत दादा पाटील व विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांच्या सूचनेनुसार त्यांची भाजपा किसान मोर्चाच्या महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस पदी किसान मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष वासुदेव काळे यांच्या उपस्थितीत निवड करण्यात आली.
यावेळी भाजपाचे जिल्हाध्यक्ष आमदार रमेश आप्पा कराड, आमदार अभिमन्यू पवार, जिल्हा परिषद अध्यक्ष राहुल केंद्रे, शहर जिल्हाध्यक्ष गुरुनाथ मगे, जिल्हा सरचिटणीस संजय दोरवे, त्र्यंबक गुट्टे, रामचंद्र तिरुके, अशोक केंद्रे सौ.शामल कारामुंगे, शिवाजी केंद्रे, विजय क्षीरसागर, जि.प सभापती रोहिदास वाघमारे, किसान मोर्चाचे जिल्हाध्यक्ष साहेबराव मुळे, महिला मोर्चाच्या जिल्हाअध्यक्ष श्रीमती रेखाताई तरडे, ज्ञानेश्वर घेवले, अमोल पाटील आदींची प्रमुख उपस्थिती होती.

About The Author

error: Content is protected !!