शिक्षण उपसंचालक रामजी होनमाने यांना अभिवादन
अहमदपूर (गोविंद काळे) : येथुन जवळच असलेल्या मौजे आंडगा येथील व हनुमान टेकडी, अहमदपुर येथील रहिवाशी दिवंगत शिक्षण उपसंचालक राम वामनराव होनमाने यांना त्रिवार अभिवादन करण्यात आले. याबाबत अधिक माहिती अशी की, आज 4 जुलै 2021 रोजी रामजी होनमाने यांची 63 वी जयंती साजरी करण्यात आली. रामजी होनमाने यांनी 1987 ते 1989 यशवंत विद्यालयात शिक्षक म्हणुन कार्य केले. 1990 ते 1995 पर्यंत जालना येथे मुख्याध्यापक म्हणुन कार्यरत आणि 1996 ते 1998 माळाकोळी येथे मुख्याध्यापक, 1998 ते 2001 गटशिक्षणाधिकारी पंचायत समिती अहमदपुर, 2001 मध्ये उपशिक्षणाधिकारी लातुर जिल्हा परिषद येथे कार्यरत, 2004 ला उपशिक्षणाधिकारी म्हणुन बीड येथे कार्यरत होते, 2006 ला शिक्षणाधिकारी म्हणुन रुजु झाले आणि 2011-2013 या काळात उपसंचालक कार्यरत होते. रामजी होनमाने यांनी आपल्या या कार्यकाळात त्यांनी चोख पणे कार्य केले आहे. 2002 रोजी बिसेफचे पहिले अधिवेशन संपन्न झाले, दुसरे अधिवेशन 2004 ला संस्कार विद्यालय, बीड येथे झाले यावेळी त्यांनी अध्यक्षीय स्थानावरुन समाजाला संबोधित केले. आज त्यांची 63 वी जयंती सर्व स्तरातुन मोठ्या उत्साहात साजरी करण्यात येत आहे. कालकथित रामजी होनमाने यांनी 2003 बिसेफ, आरपीएफ चे संस्थापक राज्याध्यक्ष व बहुजन चळवळीचे प्रेरणास्रोत, पुरोगामी विचारवंत म्हणुन संपुर्ण महाराष्ट्रात त्यांची ख्याती होती.
या अभिवादन सभेमध्ये श्रीमती भारतीबाई राम होनमाने, प्रा. बालाजी कारामुंगीकर, भास्कर होनमाने, मष्णा गुळवे, बालाजी खांडेकर, प्रज्ञा खांडेकर, प्रियंका गुळवे, सारिका गुळवे, राजेश्री कारामुंगीकर आदि उपस्थित होते. यावेळी बोलताना विद्यादेवी होनमाने म्हणाल्या की, आज जर राम होनमाने साहेब जिवंत असते तर परिवर्तनवादी चळवळीला खुप गति आली असती. बिसेफ आरपीएफ चे कार्य महाराष्ट्रातच नव्हे तर संपुर्ण भारतामध्ये नावारुपाला आले असते. रामजी होनमाने यांनी वाचन परंपरेला प्रोत्साहन दिले होते. त्यांनी शेवटच्या काळात अध्यात्माकडे वळले होते. तथागतांचे विचार आणि त्यांचे कार्य यावर ते प्रभावित झाले होते. सारानाथ येथे उपासक महासंघाचे अध्यक्ष त्यांना बनविण्यात आले होते. रामजी होनमाने साहेबांचे विचार मला घरा-घरापर्यंत पाहचावयाचे आहेत. वयाच्या 55 व्या वर्षी त्यांना देहावसान झाले. महापुरुषांना आयुष्य कमी लाभते अगदी त्याच प्रकारे नियतिने त्यांना लवकरच अनंतात विलिन करुन घेतले. असेही विद्यादेवी होनमाने यांनी शेवटी आपली प्रतिक्रिया व्यक्त करताना म्हणाल्या. यावेळी सामाजिक कार्यकर्ते, नागरीक कोरोनाचे नियम पाळुन उपस्थित होते.