नाना-नानी पार्क समोर डोळ्याला पट्टी बांधून मनपा प्रशासनाचा निषेध

नाना-नानी पार्क समोर डोळ्याला पट्टी बांधून मनपा प्रशासनाचा निषेध

लातूर (प्रतिनिधी) : रोजी नाना नानी पार्क समोर नागरिकांनी डोळ्यावर पट्टी बांधून गांधारी प्रतिकात्मक आंदोलन करीत प्रशासणाच्या मनमानी करभारा विरोधात निषेध करण्यात आला.प्रशासनास सर्व दिसत असून ही अंधळ्याची भूमिका घेत असल्याचे यावेळी आंदोलन कर्त्याकडून आरोप करण्यात आला.या सर्व बाबीकडे दुर्लक्ष करीत असल्याने डोळ्यावर काळी पट्टी बांधून निषेध करण्यात आला. लातूर शहारामध्ये मनपाच्या पाठीमागे नाना नानी पार्क बऱ्याच वर्षांपासून त्यांची निर्मिती करण्यात आली त्याचा पुरेपूर फायदा नागरिकांना झाला आणि त्याचा आनंद ही बालक घेऊ लावले लातूर शहरात एकमेव उद्यान असलेले ही उद्यान उदयास आली आणि त्या ठिकाणी नागरिकांचे मोठ्या संख्येने येऊ लागले कांही काळानंतर त्या उद्यानाचे नाव मा. विलासराव दगडोजीराव देशमुख असे देण्यात आले. नावाने नागरिकांच्या सेवेसाठी व बालकांना मनोरंजना व्हावे या करिता साहेबांच्या संकल्पेतून उद्यान उभा करण्यात आले. या संकल्पनेतून आज्जी आजोबा यांना वृद्ध वया मध्ये आनंदाने कांही क्षण व मनमोकळे पणाने कांही वेळ या उद्यानात जावे तसेच बालकांना ही कसलेही अडचण न येता हे उद्यान चालू करण्यात आले होते. या उद्यानात बऱ्याच वर्षांपासून अनेक सांकृतिक कार्यक्रम व समाजिक कार्यक्रम होतात प्रत्येकाला हा उद्यान सोयीस्कर महत्वाचा वाटतो अनेक वर्षांपासून सकाळी व संध्याकाळी जेष्ठ नागरिक व महिला तसेच बालक ही मनोरंजना साठी उद्यानात येतात आणि शरीर निरोगी आसवे या करिता फीरण्यासाठी महिला व जेष्ठ नागरिक मोठ्या संख्येने येतात असे असताना कांही महिन्यापासून तेथे खाजगी कंपनी ने मनमानी करत कांही फिरण्याचा भाग बंद केलेला आहे त्याचा त्रास नागरिकांना होत असल्याचे दिसून आल्याने सर्व नागरिकांनी व महिलांनी स्वाक्षरी मोहीम राबवून नागरिकांना फिरण्यासाठी बंद केलेला परिसर खुले करावे व नागरिकांना त्रास होणार नाही याबाबत आयुक्तांना निवेदन देण्यात आले होते. त्यावर आयुक्तांनी मी प्रत्येक्ष येऊन पाहणी करून नागरिकांना येणारे अडचणी दूर करून नागरिकांना कसलेही त्रास होणार नाहीं आसे आश्वासन देण्यात आले होते परंतु त्या बाबत आयुक्तांनी व प्रशासनाने कसलेही पाऊल उचलवले दिसून आले नाही त्या उलट खाजगी कंपनीची मनमानी वाढू लागली आणि उर्वरित असलेले परिसर ही जाळी बांधून बंद करण्याचा प्रयत्न करीत असल्याचे दिसून आले. ते पाहून नागरिक संभ्रमात पडल्याने सर्व नागरिकांनी एकत्रित येऊन प्रशासनाच्या विरोधात प्रवेशद्वार समोर डोळ्यावर काळी पट्टी बांधून निषेध करण्यात आला. आतातर प्रशासन उद्यान परिसरात भेट देऊन नागरिकांना विश्वासात घेऊन अडचण दूर करेल आणि बंद केलेला परिसर खुला करेल. तरी या बाबत पालकमंत्री मोहदय यांनी ही दक्षतेने लक्ष घालून नागरिकांना येणारे अडचण व मा. विलासराव देशमुख पार्क विना अट सर्वासाठी खुले करावे अशी अपेक्षा नागरिक करित आहेत.
यावेळी मनसेचे शहर संघटक व सामाजिक कार्यकर्ते अँड.अजय कलशेट्टी, सूर्यप्रकाश धूत, जेष्ठ नागरिक बंडाप्पा जवळे, अँड.श्रीशैल्य उडगे,अँड.शिरीष धहीवाल, डॉ.राजकुमार तोष्णीवाल, महेश सुकाळे, महानंदा हमीने, माधुरी चौधरी, मीना चंदिले, जयाबाई त्रिमुखे, मंगला हलवाई, अलकनंदा माने, सोमनाथ खुदासे,सुभाष माशाळकर, रमेश मुळे, संतोष वडवले, हेमंत वडणे,उमाकांत बट्ट्यावार, दीपक प्रयाग, विश्वनाथ धुळे, बिराजदारसर, श्रीराम कोळेकर, शिरीष माळी, लिंबाळप्पा दाणे, गजानन हुंडेकरी, अशोक पंचाक्षरी, हुशेन पठाण, मोतीराम कदम, पारस चापसी, शिवा धुळे, मन्मथप्पा पोपडे,सुधीर आडगावकर, आनंद जवळे, शिवा रोडे, अजय कामदार, आदी व महिला मोठया संख्येने उपस्थित होते.

About The Author