उपविभागीय पोलीस अधिकारी मनिष कल्याणकर यांच्या तर्फे गोरगरीब मुलांना दिवाळी फराळ वाटप
अहमदपूर( गोविंद काळे ) भारतात साजरा होणारा सर्वात मोठा आणि उज्वल सण म्हणजे दिवाळी होय. दिवाळी म्हणजे दिव्यांचा उत्सव. हा सण अंधारावर प्रकाशाच्या विजयाचे प्रतिक आहे. हा सण खूप उत्साहात साजरा केला जातो. घराघरात आनंदाने आणि आपापल्या परिस्थितीनुसार नवीन कपडे, दागिने, फराळ या गोष्टींबरोबर हा सण साजरा करतात. पण समाजात काही कुटुंब अशी आहेत कि ते केवळ आर्थिक दुर्बलतेमुळे सण साजरा करू शकत नाहीत. सर्वत्र दिवाळी साजरी होत असताना समाजातील निराधार, गरीब कुटुंब मात्र या आनंदापासून दूर असतात. या वंचित घटकांतील व्यक्तींनाही दिवाळीचा आनंद घेता यावा, त्यांचीही दिवाळी गोड व्हावी यासाठी उपविभागीय पोलीस अधिकारी अहमदपूर मनिष कल्याणकर यांच्या
तर्फे शहरातील विविध भागातील गोरगरीब लहान मुलांना दिवाळी फराळ वाटप करण्यात आले. तसेच
कार्यालयातील कर्मचारी यांना देखील मिठाई सोबत
दिवाळी फराळाचे वाटप करण्यात आले.
यावेळी बोलताना उपविभागीय पोलीस अधिकारी मनिष कल्याणकर म्हणाले कि, दरवर्षी समाजातील गरजू व गरीब कुटुंबांना तसेच लहान मुलांना मोफत फराळ वाटप करण्यात येतो. याप्रकारे त्यांच्या जीवनात आनंदाचे क्षण देण्याचा माझा प्रयत्न नक्कीच यशस्वी होतो. त्यानुसार यंदाही मी समाजातील गोर गरीब कुटुंबातील लहान मुलांना तसेच कार्यालयात माझ्या सोबत काम करणाऱ्या कर्मचारी यांना मिठाई सोबत दिवाळी फराळाचे वाटप करण्यात आले.